मी भाजपाचा तालुकाध्यक्ष होतो तरीही मी शिवसेनेत फुट पडल्या नंतर तालुक्यासह संपर्कातील शिवसैनिकांना शिंदेच्या शिवसेनेत जाण्यासाठी प्रवृत्त केले - प्रचार सभेतुन पिंगळेची कबुली
स्व .हिंदुऱ्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे , स्व . गोपिनाथ मुंडे यांच्यावर प्रेमकरणारा प्रत्येकजण आज माझ्या सोबत आहे हिच खरी माझी निष्ठा आहे - पिंगळे
देशभक्त न्युज - ईटकूर प्रतिनिधी / -
सध्या सर्वत्रच विधानसभेची रणधुमाळीची जोरदार आरोप - प्रत्यारोपांच्या फैलीने राजकीय आखाड्यात रंगत आली असुन धाराशिव - कळंब विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदावार अजित पिंगळे यांच्या प्रचारार्थ कळंब तालु क्यातील ईटकूर येथील विठ्ठल रुक्मीणी मंदिरा समोरील मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना अजित पिंगळे यांनी आपल्या शिवसेनेच्या एक निष्ठतेबाबत दाखले देत विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर आणि प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील यांच्याकामकाजाचा उपस्थित मतदारांसमोर पर्दाफाश केला.
पुढे बोलताना पिंगळे म्हणाले की आपल्या जिल्ह्याच्या खासदाराने मी असेन , शिवाआप्पा कापसे , यांच्या तिकीटा सदर्भात भांडणे लावून दिली .मी भाजपात जाण्या अगोदर खासदांरांचा जवळचा खंबीर सच्चा शिवसैनिक एक पदाधिकारी होतो . त्यामुळे खासर ओमराजेनिंबाळकर यांचा मला चांगला अभ्यास असुन खासदाराचा स्वभाव म्हणजे गुण गाईचे आणि रूप कसायाचे असे आहे . त्यामुळे या खासदारा पासुन आतातरी सावध रहाण्याचे अवाहन केले .
पिंगळे पुढे बोलत असताना असेही म्हणाले की आज धाराशिव - कळंब मतदार संघातील मतदार हे रात्री उशिरापर्यंत मी गठिभेटीस येईल म्हणून वाट पहातात व धाराशिव कडील मतदार हे जसे कळंब तालुक्यातील ईटकूर जवळील पाथर्डी म्हणून ओळखतात तसे प्रतिस्पर्धी उमेदवार हे जरी मी कळंब तालुक्यातीला रहिवाशी म्हणून सांगण्याचा केविलवाणा प्रचार करीत असले तरी त्यांचा रहिवाशी पत्ता धाराशिव तालुक्यातला आहे असे सांगुन त्यांच्या कळंब तालुक्यातील रहिवाशी यावर पिंगळे यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले .
पुन्हा पिंगळे असेही म्हणाले की , मला अशी महिती कळाली की आ . कैलास पाटील मी एकनिष्ठ असल्यामुळे सुरतला जाताना रस्त्यातून माघारी आलो असे मतदारांची सहानुभुती मिळविण्यासाठी सांगतात परंतु तसे नाही तर त्यांच्या वडिलांचा फोन आल्यामुळेच ते माघारी आले .
यावेळी या प्रचार सभेच्या व्यासपिठावर कृउबासतीचे सभापती शिवाजी आप्पा कायसे , महायुतीमधील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार ) गटाचे प्रा . सुशिल शेळके , कृउबास संचालक तथा अरुण काका चौधरी ,कृउबास संचालक तथा कोठाळवाडीचे सरपंच अंनंत बाबा लंगडे , मा . कळंब पंस . उपसभापती लक्ष्मण आडसुळ ,भाजपाचे मा . जिप . सदस्य बालाजी बप्पा आडसुळ , महादेव पावले , सचिन गंभिरे , शिवाजी आडसुळ , ग्राप सदस्य आण्णा काळे , विनोद चव्हाण , सत्यदेव जगताप , माजी . सरपंच अभिमान भाऊ आडसुळ , भारत तात्या जाधव , धनाजी पाटील आदिंची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी प्रा . सुशिल शेळके , लक्ष्मण आडसुळ यांनी आपल्या तालु क्यातील अजित पिगळेंना यावेळी आमदार करण्याची मतदारांना अवाहन केले .
मतदारांनी यावेळी बदल करून आपल्या हक्काचा आमदार करण्यासाठी अजित पिंगळेला मोठया मताधिक्क्यानी निवडुन द्या - शिवाजी आप्पा कापसे .
मतदारांनी यावेळी बदल करून आपल्या हक्काचा , आपल्या तालुक्यातील शिवसेनेशी बालपणापासुन नाळ असलेला सदैव माणसात राहुन त्यांच्या सुखदु : खात सहभागी होणारा . या मतदार संघातील विकासांची जाण असलेला एक कार्यकर्ता म्हणून अजित पिंगळेकडे पाहिले जातेय म्हणून सदैव निवडु आल्यास मतदारांच्या विविध प्रश्नांकडे पाठ फिरवणारा नव्हे तर त्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणारा असा आता अजित पिंगळे सारख्या सर्वसामान्य उमेदवाराला आता आपल्या हक्काचा आमदार केल्या शिवाय आपण आता शांत बसायचे नाही अशी भावनीक सादही मतदारांना आपल्या बोलण्यातुन कापसे यांनी घातली .
सभेचे सुत्रसंचलन सेवानिवृतशिक्षक तुकाराम शिंदे यांनी केले .

