33 वर्षानंतर नागपुरात महाराष्ट्रराज्याच्या मंत्रीमंडळातील 33 कॅबीनेट व 6 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ नव्या चेहऱ्यांना संधी तर अनेक दिग्गजांना डिच्चु
देशभक्त न्युज - नागपूर प्रतिनिधी / -
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात सर्वाधिक जागा जिंकत भाजप नंबर एकचा पक्ष ठरला. भाजपने विधानसभेत तब्बल 132 जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने 41 आणि शिवसेना शिंदे गटानं 57 जागांवर विजय मिळवला. त्यानंतर आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज 33 वर्षानंतर नागपुरात महाराष्ट्रराज्याच्या मंत्रीमंडळातील 33 कॅबीनेट व 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली आणि नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. भाजपच्या सर्वाधिक 19 मंत्र्यांनी शपथ घेतली, तर शिवसेना शिंदे गटाच्या 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. नव्या सरकारच्या एकूण 39 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये 33 आमदारांनी कॅबिनेट 6 आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, भाजपच्या 9 तर शिंदे गटाच्या 6 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यासोबतच अजित पवार गटाच्या पाच नव्या चेहऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ यावेळी घेतली. सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रीपद, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातही तीन-तीन कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यात अजित पवार यांच्यासह तीन कॅबिनेट एक राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.
राज्याचे नवे मंत्रीमंडळ 33 कॅबिनेट मंत्री : - यामध्ये
चंद्रशेखर बावनकुळे ,राधाकृष्ण विखे पाटील , हसन मुश्रीफ , चंद्रकांत पाटील , गिरीश महाजन , गुलाराव पाटील , गणेश नाईक , दादा भुसे , संजय राठोड , धनंजय मुंढे , मंगलप्रभात लोढा , उदय सावंत , जयकुमार रावल , पंकजा मुंडे ,अतुल सावे ,अशोक उईके ,शंभूराजे देसाई , आशिष शेलार ,दत्तात्रय भरणे ,आदिती तटकरे , शिवेंद्रसिंहराजे भोसले ,माणिकराव कोकाटे ,जयकुमार गोरे , नरहरी झिरवळ ,संजय सावकारे , संजय शिरसाठ , प्रताप सरनाईक , भरत गोगावले ,मकरंद जाधव पाटील , नितेश राणे , आकाश फुंडकर , बाबासाहेब पाटील ,प्रकाश आबिटकर .
तर 6 राज्यमंत्री : - यामध्ये
माधुरी मिसाळ , आशिष जयस्वाल ,पंकज भोयर , मेघना बोर्डीकर , इंद्रनिल नाईक ,योगेश कदम .यांचा फडणवीस , शिंदे , पवार मंत्रीमंडळात सामावेश करण्यात आला आहे .
धाराशिवकरांच्या पदरी मात्र निराशा
नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळात आ . राणाजगजितसिंह पाटील किंवा आ . प्रा . डॉ . तानाजीराव सावंत यांची मंत्रीमंडळात वर्णी लाजून नक्की संधी मिळेल अशी धाराशिव येथील भाजप व शिवसेना शिंदे गट पक्षातील कार्यकर्त्यांना मोठ्या आशा होत्या पण झालेल्या मंत्रिमंडळात जिल्ह्याला स्थान न मिळाल्याने सर्वाच्या आशेवर पाणी फिरले आहे .
