सातलिंग स्वामींना समाजरत्न पुरस्कार जाहीर
देशभक्त न्युज -
कर्तव्याच्या पलीकडे जाऊन गोरगरीब, पिडीत शोषित घटकांना न्याय हक्क प्राप्त करून देण्यासाठी अहोरात्र झटणारे माजी मंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक तथा सामाजिक कार्यकर्ते सातलिंग स्वामीं यांना
नवरत्न न्युज रिपोर्टर परिवारातर्फे देण्यात येणारा यंदाचा समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा नवरत्न न्युज रिपोर्टर परिवारातर्फे पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येतो.यंदा हा पुरस्कार सोहळा 20 ऑगस्ट रोजी उमरगा तालुक्यातील सोमेश्वर मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सातलिंग स्वामींना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.माजी मंत्री बच्चू भाऊ कडू,खासदर ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, शिवा संघटनेचे प्रा मनोहर धोंडे,ठाकरे गट शिवसेनेचे बाबुराव शहापूरे, माजी नगराध्यक्ष रजाक आत्तार आदींनी सातलिंग स्वामींना त्यांच्या कार्याचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या आहेत.
