तेवीस वर्षांनंतर तत्कालीन दहावीच्या विद्यार्थ्यांचे " वर्गमित्र स्नेह मिलन " कार्यक्रम संपन्न
देशभक्त न्युज -
नळदुर्ग येथील दमयंती महिला शिक्षण संस्था संचलित अंजली प्रशालेचे सन २००० या वर्षांतील इयत्ता दहावीचे विद्यार्थी तब्बल २३ वर्षांनंतर "वर्गमित्र स्नेह मिलन" या कार्यक्रमाच्या माध्यमातुन एकत्रित आले होते. यावेळी त्यांनी आपल्या गुरुजनांचा सत्कार करण्याबरोबरच आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
दमयंती महिला शिक्षण संस्था संचलित अंजनी प्रशालेचे सन २००० या वर्षाचे विद्यार्थी तब्बल २३ वर्षांनंतर एकत्रित आले होते. दि.१६ ऑगस्ट रोजी येथील अंबाबाई मंदिर सभागृहात या विद्यार्थ्यांनी "वर्गमित्र स्नेह मिलन " या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दमयंती महिला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुभद्राताई मुळे या होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणुन अंजनी प्रशालेतील सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच सेवानिवृत्त शिक्षक बालभीमराव मुळे, सुभाषराव महाबोले व उद्धव सुरवसे हे उपस्थित होते. प्रारंभी सर्व मान्यवरांचा व आपल्याला शिकविलेल्या शिक्षकांचा या विद्यार्थ्यांनी सत्कार करून त्यांचा गौरव केला.
तब्बल २३ वर्षानंतर अंजनी प्रशालेतील विद्यार्थी "वर्गमित्र स्नेह मिलन" या कार्यक्रमाच्या माध्यमातुन पुन्हा एकत्रित आले. यावेळी या विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत ते दिवस आठविण्याचा प्रयत्न केला.२३ वर्षानंतर भेटलेल्या या मित्रांमध्ये विविध विषयांवर व त्यांच्या कोटुंबिक जीवनावर चर्चा झाली. हे विद्यार्थी कमालीचे आनंदीत होण्याबरोबरच भावुकही तितकेच झाले होते.
२३ वर्षांनंतर जे विद्यार्थी एकत्रित आले होते त्यामध्ये शिलवंत मुळे, समीर सुरवसे, नितीन सुरवसे, अमोल सुरवसे, संदीप गायकवाड, संतोष महाबोले, अविनाश महाबोले, विक्रम जाधव, विठ्ठल पवार, शिरीष भुमकर, विनोद जाधव, लक्ष्मण लांडगे, रवी पावले, अशोक घोडके, शहाजी दासकर, मिथुन चौधरी, शिवाजी सुरवसे, अल्का कांबळे, मनिषा जाधव, उमा मुळे, शिल्पा भुमकर, शुभांगी मुळे, सुवर्णा जाधव व रेखा जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
