कंटेकूरच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी स्वातंत्र्य दिनाचे टाय-बेल्टचे दिले गिप्ट
देशभक्त न्युज उमरगा -
कंटेकूर ता.उमरगा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथ शाळेतील शिक्षकांनी इ.१ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना स्वखर्चाने स्वातंञ्य दिनाचे औचित्य साधुन टाय-बेल्टचे वाटप शा. व्य. समितीचे अध्यक्ष जागृत शिंदे, उपाध्यक्ष सौ . सोनाली निंबरगे, सदस्य शिक्षणतज्ञ पांडुरंग धुमाळ, सरपंचपती शिवाजी जमादार, मुख्याध्यापक कमलाकर मोटे, यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी प्रास्ताविकात लक्ष्मण येवते म्हणाले "शासनाने सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले आहे. स्पर्धेच्या काळात व्यक्तीमत्व खुलून दिसण्यासाठी टाय-बेल्टचे वाटप उपक्रम आम्ही राबविला." विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी हा समाजोपयोगी उपक्रम असल्याचे सांगुन मुख्याध्यापकांनी शिक्षकांचे कौतुक केले.
सुञसंचलन लक्ष्मीकांत पटणे यांनी केले. विद्यार्थ्यांना टापटिपपणा, स्वच्छता, निटनेटकेपणा या बाबत शिक्षक गोविंद जाधव, विठ्ठल कुलकर्णी, लतिफ लदाफ, सौ.चित्ररेखा दंडे, तनुजा गाढवे, यांनी माहिती दिली.शेवटी सर्वांचे आभार प्रदर्शन शिवकुमार स्वामी यांनी मानले.
