Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अखेर शासनाकडून जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा जिआर निघाला

 अखेर शासनाकडून जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा जिआर निघाला 







सुरूवातीला 50 कोटीच्या निधीची तरतूद                       

शिवा संघटनेच्या अनेक वर्षांच्या प्रयत्न पाठपुराव्याला मोठे यश          

देशभक्त न्युज उमरगा - 

शिवा संघटनेच्या प्रयत्नाने आणि पाठपुराव्यामुळे अखेर "क्रांतीसुर्य, जगत ज्योती , महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला" पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर करून महाराष्ट्रात राज्य शासनाने तसा त्याबाबत जीआर काढला.


 सर्वप्रथम महामंडळासाठी अनेक वर्षांपासून असणारी ही यशस्वी मागणी, प्रयत्न पाठपुरावा आणि यश संपादन करणारे शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहरजी धोंडे सर तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व महाराष्ट्र राज्य शासनाचे शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना महाराष्ट्र राज्य शाखेच्या आणि उस्मानाबाद जिल्हा शाखेच्या व समस्त वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने याचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे. 

प्रा. मनोहर धोंडे सरांनी शिवा संघटनेच्या माध्यमातून वीरशैव लिंगायत समाजाला आरक्षण संरक्षण , शिवा वीरशैव मोक्षधाम योजना, महात्मा बसवेश्वर यांची शासकीय जयंती, कपिलधार तिर्थक्षेत्र दर्जा, शासकीय महापूजा, परिसराच्या विकासासाठी आर्थिक तरतूद, महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार यासह शेकडो समाज हिताची यशस्वी कार्य केली आहेत .


 प्रा.मनोहर धोंडे सरांनी दुरदृष्टी ठेऊन वीरशैव-लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची सर्वप्रथम मागणी केली व अनेक वर्षं प्रयत्न पाठपुरावा करून महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची शासनाकडून मंजुरी मिळवली आहे. या महामंडळामुळे महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजातील हजारो,लाखो बेरोजगार तरुणांना स्वतंत्र व्यवसाय, उद्योग उभा करण्यासाठी 50 कोटी निधी उपलब्ध होणार आहे. महामंडळास यापुढे प्रत्येक वेळी वाढिव निधीसाठी शिवा संघटना प्रयत्नशील असणार आहे. या सामाजिक प्रश्नी प्रा . धोंडे सरांच्या सदैव मार्गदर्श नाखाली व त्यांच्या खांद्याला खांदा लावून सदैव काम करणारे प्रशासन स्तरवरील अनेक वर्षापासुन दांडगा अनुभव असणारे अखिल भारतीय विरशैव लिंगायत युवक संघटनेचे महाराष्ट्र चिटणीस तथा जिल्ह्यातील उमरगा - लोहारा विधानसभा मतदार संघातुन शिवा संघटने कडुन ज्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे असे सातलिंग स्वामी यांच्या कार्याला यश मिळाल्याची समाज बांधवातुन चर्चा होत आहे .

जे बोलतात ते प्रा. मनोहरजी धोंडे सर करून दाखवतात हा वीरशैव-लिंगायत समाजाला अनुभव असल्याने व त्यांच्यावर विश्वास असल्याने समाजात प्रा .मनोहर धोंडे सरांचा चाहता वर्ग फार मोठा आहे.

महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या यशस्वीते बद्दल प्रा . मनोहर धोंडे सरां सोबतच सातलिंग स्वामी यांचे  वीरशैव-लिंगायत समाजासह विविध समाजातुन अभिनंदन व कौतुक होत आहे.                 

लवकरच महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ प्रत्यक्षात अमलात येणार आहे त्याचा वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी लाभ घेऊन स्वतंत्र उद्योग व्यवसायात उंच भरारी घ्यावी तसेच सदरील योजनेसाठी उस्मानाबाद येथे डॅा.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागात संपर्क साधावा असे आवाहन शिवा संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.