दिव्यांग सक्षम झाला पाहिजे त्याला विविध योजनेचा लाभ मिळाला पाहिजे - प्रदीप डोके
देशभक्त न्युज कळंब -
दिव्यांगाला समाजात मानसन्मानाने जगता यावे तो सक्षम बनावा शासनाच्या योजनेचा त्याला लाभ घेता यावा यासाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटना 1996 पासून काम करीत असून शेष योजना, विमा योजना याचा त्याला लाभ मिळावा त्याचबरोबर दिव्यांगाना संजय गांधी निराधार योजनेमधून तीन हजार रुपये प्रतिमहा मिळाली पाहिजेत यासाठी संघटना शासनाकडे पाठपुरावा करीत आहे यासाठी जास्तीत जास्त दिव्यांगाने संघटनेचे सदस्यत्व स्वीकारावे संघटना आपल्या न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे असे विचार प्रदीप डोके संस्थापक प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य दिव्यांग (अपंग) संघटना यांनी सोजर मतिमंद विद्यालय येथे आयोजित दिव्यांग बैठकीत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत असताना व्यक्त केले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रा.श्रीधर बाबा भवर ,ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, तालुका सचिव माधवसिंग राजपूत ,सामाजिक कार्यकर्ते बंडू ताटे ,जिल्हाध्यक्ष पांडुरंग मिसाळ , संस्थापक सचिव रियाज पठाण , सरचिटणीस चॉदपाशा शेख ,सतीश पवार आदिवासी संघटना भूम हनुमंत बोराडे सोजर मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन गरड ,यांची उपस्थिती होती प्रा. श्रीधर बाबा भवर यांनी शिकविणे कला आहे त्यापेक्षा शिकणे अवघड आहे दिव्यांगाना एखादा अवयव नसतो परंतु त्याचा दुसरा अवयव जास्तीचे काम करतो त्याचा विकास करावा असे सांगितले महादेव महाराज अडसूळ यांनी अपंग व असाह्य दिव्यांगाना मदत करण्यासाठी पुढे येत आहे हे कार्य मोलाचे आहे असे सांगितले तर माधवसिंग राजपूत यांनी दिव्यांगाचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे त्यांना आपल्या सहानभूतीची गरज नाही तर आपल्या प्रेमाची गरज आहे असे सांगून अनेक दिव्यांग आपले काम उत्कृष्टपणे करीत आहेत त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे असे सांगितले कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर छत्रपती राजर्षि शाहू महाराज, हेलन केलर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले यानंतर अच्युत मंडळे यांची दिव्यांग संघटनेच्या कळंब तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल ,श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात रोहिणी पवार यांनी उपस्थित दिव्यांगाना व सोजर मतिमंद विद्यार्थ्यांसाठी भोजन व्यवस्था केली त्यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला त्याचबरोबर सोजर मतिमंद विद्यालयाचे शिक्षक वैजनाथ डुकरे (दिव्यांग) यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी प्रास्ताविक अरुण बारबोले यांनी व आभार दीपक मंडाळे यांनी मानले या कार्यक्रमासाठी मुन्ना काळे ,अशोक मंडाळे ,किसनराव गवळी यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कालिदास लोखंडे ,बळीराम मिटकरी ,शामराव जाधव, शकीला मुलानी यांनी परिश्रम घेतले.
