देशभक्त प्रतिनिधी -
कळंब तालुक्यातील मौजे आंदोरा येथे लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहने साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जयंती निमित्ताने विविध महा पुरुषांच्या प्रतिमेचेही यावेळी पुजन करण्यात आले . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला नितीन तामाने यांनी पुष्पहार अर्पण केला व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला ग्रामविकास अधिकारी पी.एन. बोंदर यांनी पुष्पहार अर्पण केला, तसेच लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस आदिनाथ कवडे यांनी पुष्पहार अर्पण केला, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस उपसरपंच दत्तात्रय तांबारे यांनी पुष्पहार अर्पण केला तर ध्वजारोहण आंदोरा ग्रामपंचायतचे सरपंच बळवंतराव तांबारे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला भाऊ लोंढे, राजरत्न गाडे, सुरेश लोंढे, भीमराव सिरसट, उमेश कवडे, सचिन लोंढे,आप्पा मिसाळ,आदिनाथ कवडे अंब्रुषी लोंढे,नाना लोंढे, प्रज्वल वैद्य, बबन लोंढे, पोपट लोंढे, कोंडीबा मिसाळ,भीम नगर मधील बौद्ध बांधव तसेच साठे नगर मधील बालक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप लोंढे यांनी केले.
