कळंब येथे भव्य सत्कार करून सर्वांच उपस्थितीमध्ये कापण्यात आला केक
देशभक्त न्युज -
लेडीज क्लब, उस्मानाबादच्या वतीने कळंब येथील जवाहर टॉकीजमध्ये प्रसिद्ध मराठी चित्रपट 'बाईपण भारी देवा' हा सलग ३ दिवस ३ शो मध्ये महिलांना मोफत दाखवण्यात येत आहे. या ठिकाणी कळंब तालुक्यातील कृउबास संचालक अरुण काका चौधरी , भाजपा किसान मोर्चा धाराशिव जिल्हाध्यक्ष संजय पाटील , भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण तात्या शिंदे - पाटील , भाजपा तालुका सरचिटणीस प्रदिप भैय्या फरताडे , भागचंद बागरेचा , मनोज साळुंखे , संजय बोंदर , अॅ ड . रामराजे जाधव , अशोक क्षिरसागर , राहुल लंगडे आदि प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला भगिनींनी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास सौ.अर्चनाताई पाटील यांना शुभेच्छा दिल्या . यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांचीही उपस्थिति होती .चित्रपट पाहण्यासाठी यावेळी महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद होता . महिलांची संभाव्य गर्दी पाहता कळंब तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परीषद गट प्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त महिला भगिनींनी चित्रपट पाहावा असे आवाहन लेडीज क्लब च्या वतीने करण्यात आले आहे.



