नळदुर्ग येथे भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांसाठी विशेष कॅम्प संपन्न
देशभक्त न्युज -
उस्मानाबाद जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तहसील कार्यालयाकडून दि. १७ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्रशाला नळदुर्ग येथे विशेष कॅम्प घेऊन त्यांना आवश्यक असलेले कागद पत्राची पूर्तता करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे कमलाकर चव्हाण व परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग चे सचिव मारुती बनसोडे यांनी या कॅम्प मध्ये होणाऱ्या कामाची माहिती दिली. भटक्या विमुक्त जाती जमातीच्य लोकांचे अनेक प्रश्न आहेत आधार कार्ड, मतदान नोंदणी, रेशन कार्ड, जात प्रमाण पत्र, निवारा इत्यादी मुलभूत सुविधा पासून वंचित राहिलेल्या लोकांना कागद पत्राची पूर्तता करण्यासाठी शासनाने हे विशेष कॅम्प आयोजित केले होते या कॅम्प मध्ये पारधी, डवरी गोसावी, मसणजोगी, वैदू ,गोंधळी समाजाचे अनेक लोक सहभागी झाले होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन एस के गायकवाड यांनी केले.यावेळी मंडळ अधिकारी जयंत गायकवाड यांच्या उपस्थितीत
आर बी वाघमारे (संगायो) दत्तात्रय मुदगल, अंकुश जाधव (पुरवठा) आकाश माळकुंजे (आधार कार्ड) महमद फुलारी, बी एस सर्जे पारधी समाजाचे नेते पंडीत भोसले, सुनिता भोसले,दयानंद भोसले, कुंदन भोसले, पिंकी भोसले, चित्रा काळे प्रदीप भोसले सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
