आंदोरा येथे स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा
देशभक्त न्युज ( राहुल गाडे - आंदोरा )
कळंब तालुक्यातील मौजे आंदोरा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण सरपंच बळवंत तांबारे यांच्या हस्ते करण्यात आले अणि माजी सैनिक नागनाथ मुटके,अखिल शेख, राजेंद्र शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप लोंढे यांनी केले. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी कार्तिकी कापसे व अर्जुन तांबारे यांना सरपंच बळवंत तांबारे यांनी एक हजार रुपये बक्षीस दिले, तर शालेय समिती अध्यक्ष आदिनाथ कवडे, उपाध्यक्ष रवींद्र तांबारे व ज्येष्ठ नागरिक आनंत तांबारे यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. शिक्षिका तोडकर आर.एस यांनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक घड्याळ बक्षीस दिले. या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका, पालक, विद्यार्थी व गावातील नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजर होते.
