बाभळगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंत्ती उत्साहात, महिला आघाडी आधुनिक लहुजी सेनेच्या शाखेचे उदघाटन
देशभक्त न्युज ( दिनेश सलगरे - इटकळ )
तुळजापूर तालुक्यातील मौजे बाभळगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली असुन याच प्रसंगी महिला आघाडी आधुनिक लहुजी सेना शाखेचे उदघाटन करण्यात आले .साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि आजचा मातंग समाज याविषयी मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी समाज बांधवाना केले .
यावेळी महाराष्ट्र राज्य आधुनिक लहुजी सेनेच्या संस्थापिका नगीनाताई कांबळे, राज्य प्रवक्ते लक्ष्मण क्षीरसागर, मृणाल कांबळे, मराठवाडा संपर्क प्रमुख अनिल सगट, उस्मानाबाद जिल्हा संघटक कुंडलिक भोवाळ, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तुळसाबाई बनसोडे, तालुकाध्यक्ष रामजी गायकवाड, मिडिया प्रमुख विजय कांबळे, प्रमोद शेंडगे, तालुका युवाध्यक्ष रोहित गायकवाड, बाभळगाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विकास पाटील, सामाजिक कार्यकर्ते नितीन कांबळे, शुभांगी वाघमारे,माजी सरपंच आप्पाराव गाडेकर,जयंत पाटील, मोहन थोरात, अतुल बागडे यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी आधुनिक लहुजी सेनेच्या महिला शाखेचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष नगीनाताई कांबळे,व राज्य प्रवक्ते लक्ष्मण क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित व आजच्या मातंग समाजाची सद्य परिस्थिती यावर या कार्यक्रमात चर्चा करण्यात आली
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामजी गायकवाड यांनी केले तर आभार तुळसाबाई बनसोडे यांनी मानले
यासाठी तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष तानाजी बनसोडे, मारुती लोंढे,विलास काळुंके,मल्लेश लोंढे, प्रशांत गायकवाड, बालाजी लोंढे, यशोदा लोंढे, वंदना थोरात, सुनिता कसबे, लताबाई काळुंके, मंगेश कसबे, समाधान बनसोडे, गौरव काळुंकेसह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला होता.
