दोन्ही गावच्या ग्रामस्थाकडून ढोलताशाच्या , फटाक्याच्या अतिष बाजीत स्वागत स्वामी कडे आपल्या व्यथाही मांडल्या .
उमरगा देशभक्त न्युज -
तालुक्यातील कसगी आणि कसगीवाडी ग्रामस्थानी दि. 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी माजी मंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामींचा जंगी स्वागत व सत्कार केला दरम्यान सातलिंग स्वामींनी ग्रामस्थशी सुसंवाद साधत अडचणी जाणून घेताना दिसून आले.
उमरगा तालुक्यातील कसगी आणि कसगीवाडी येथील ग्रामस्थ्यांच्या अडीअडचणी केवळ फोन वर प्राप्त होताच त्या आपल्या परीने पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावल्याने येथील ग्रामस्थानी एकत्र येत सातलिंग स्वामींचा कसगी गावात बँड बाजाच्या गजरात फटाक्यांची अतीषबाजी करीत जंगी स्वागत केले व येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराच्या सभागृहात यथोचित सत्कार केला..
यावेळी महिला, पुरुष,लहान मुले, शालेय विद्यार्थी, शेतकरी, कामगार, व्यापारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वप्रथम कसगीवाडी गावाला सातलिंग स्वामींनी भेट दिली आणि येथील ग्रामस्थाशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी दिव्यांग, विधवा महिला, जेष्ठ नागरिक आणि आरोग्य विषयक अडचणींना प्राधान्य देत मदतीसाठी कधीही फोन करा अडचण दूर करू असे त्यांनी यावेळी उपस्थितांना अश्वासन दिले.
याबरोबरच कासगी गावात प्रवेश करताच ग्रामस्थ्यांच्या वतीने बँड बँजो च्या गजरात तेथेही त्यांचे ग्रामस्थानी जंगी स्वागत केले, गावातील मंदिरात दर्शन झाल्यावर सभामंडपात आयोजित सोहळ्यात उपस्थितांशी स्वामी यांनी सुसंवाद साधला असता गावातील काही युवकांनी व महिलांनी बेरोजगारी चा ज्वलंत प्रश्न या सोहळ्यात उपस्थित करून गावातील अवैध धंदे हद्दपार करा अशी मागणी केली तेंव्हा लवकरच उमरगा औद्योगिक वसाहतीत मोठ्या नामांकित कंपनीचा शुभारंभ होणार असून त्यातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याची हमी सातलिंग स्वामीनी दिली आणि गावातील अवैध धंदे बंद करण्याच्या अनुषंगाने माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नावे निवेदन अर्ज देण्याबाबत सांगितले.
दरम्यान कसगी गावातील राहुल शरनू करपे या तरुणाचा विद्युत प्रवाहाचा संपर्क झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता, सातलिंग स्वामींनी आपल्या सहकार्यासोबत या करपे परिवाराची सांत्वनपर भेट देत परि

