येरमाळा देशभक्त न्युज -
जनहित परीवाराचे संस्थापक प्रा .संतोष तौर यांना वृंदावन फाउंडेशन व राजमुद्रा संशोधक विकास केंद्र पुणे यांच्या वतीने वृंदावन भूमिपुत्र गौरव पुरस्कार संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे १० वे वंशज ह भ प शिवाजीराव महाराज मोरे देहूकर व राज्यापाल नियुक्त सिनेट सदस्य रवीद्रजी शिंगणापुरकर सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी वृंदावन फाऊडेशन चे संचालक सचिन पाटील परीवाराचे मार्गदर्शक दयानंद बिडवे , अॅ ड . महेंद्र कासार , येडेश्वरी बहुउद्देशीय सामाजीक संस्थेचे अध्यक्ष संतोष आगलावे, जनहित पत संस्थेचे व्हा चेअरमन नितिन अप्पा कवडे उपस्थीत होते हा भव्य कार्यक्रम भाविसा सभागृह सदाशिव पुणे येथे संपन्न झाला .
