Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यांची भव्यता डोळे दिपवून टाकणारी. हभप. रुपालीताई सवने





देशभक्त न्युज नळदुर्ग -

नळदुर्गच्या प्राचिन व ऐतिहासिक किल्ल्याची भव्यता डोळे दिपवुन टाकणारी आहे. हा राज्यांतील सर्वात मोठा भुदुर्ग किल्ला आहे. हा किल्ला प्राचिन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असल्याचे प्रसिद्ध निरूपणकार व ह.भ. प.रुपालीताई सवने यांनी नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्याची पाहणी केल्यानंतर म्हटले आहे.

        ऐतिहासिक नळदुर्ग शहरात पहिल्यांदाच  नंदकुमार डुकरे व त्यांच्या सुविद्य पत्नी उषाताई डुकरे यांच्या संकल्पनेतुन व संपुर्ण भोई समाजाच्या सहकार्याने सुरू असलेल्या श्रीमद भागवत सप्ताह निमित्त परतुर येथील प्रसिद्ध निरूपणकार व ह.भ. प.रुपालीताई सवने या नळदुर्ग शहरात आलेल्या आहेत. याठिकाणी वास्तव्यास असतांना त्यांनी नळदुर्ग येथील श्री प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र रामतीर्थ तसेच नळदुर्ग शहराचे भुषण असलेल्या नळदुर्गच्या प्राचिन व ऐतिहासिक किल्ल्याला भेट देऊन किल्ल्याची पाहणी केली. यावेळी बोलतांना त्यांनी म्हटले की, नळदुर्गची भुमी ही पवित्र आहे. कारण ही भुमी क्रांतीकारकांची, कलाकारांची व संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी आहे.

       नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला हा राज्यांतील सर्वात मोठा भुदुर्ग किल्ला आहे. या किल्ल्याची भव्यता आजही डोळे दीपवुन टाकणारी आहे. किल्ल्यातील नेत्रदीपक असणारा पाणी--महाल, नर--मादी धबधबा, टेहळनी करण्यासाठी उभा असलेला उपली बुरुज, बारादारी,हुलमुख दरवाजा, गणपती महाल, रंगमहाल हे किल्ल्यातील ऐतिहासिक स्थळे पाहिल्यानंतर मन प्रसन्न होते. त्याकाळी आतासारखे तंत्रज्ञान उपलब्ध नसतानाही या किल्ल्याची जी उभारणी करण्यात आली आहे. यावरून आपले प्राचिन तंत्रज्ञान किती प्रगल्भ होते याचा अंदाज येतो असेही रुपालीताई सवने यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.