Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. हरी नरके यांना कळंब येथे भावपूर्ण श्रद्धांजली

 ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. हरी नरके यांना कळंब येथे भावपूर्ण श्रद्धांजली 



देशभक्त न्युज कळंब -

 महाराष्ट्रातील थोर साहित्यिक विचारवंत परिवर्तनाच्या चळवळीतील शिलेदार ओबीसी समाजाच्या प्रश्नासाठी समाज परिवर्तनाच्या चळवळीत आयुष्यभर योगदान देणारे शाहू ,फुले ,आंबेडकर यांचे विचार आपल्या साहित्यातून तसेच व्याख्यानातून परखडपणे मांडणारे थोर थोर संशोधक महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाज तसेच जीवन कार्यावर सखोल अभ्यास करून त्याची मांडणी करणारे प्रा. हरी नरके यांचे दिनांक ९ ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कळंब येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दोन मिनिटे स्तब्ध उभा राहून श्रद्धांजली अर्पण केली त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आपले विचार व्यक्त केले तसेच कळंब तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमात उपस्थित राहून केलेले मार्गदर्शन या आठवणी याप्रसंगी प्रा. अरविंद खांडके ,संतोष भोजने, अरुण माळी, ज्येष्ठ साहित्यिक के .व्ही .सरवदे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सी.आर .घाडगे, डी .टी .वाघमारे, महादेव महाराज अडसूळ ,माधव सिंग राजपूत ,प्रकाश भडंगे ,यशवंत हौसलमल, रमेश बोर्डेकर ,बंडू ताटे, प्रा. राजेंद्र खडबडे, सचिन डोरले, निलेश पांचाळ ,दत्ता गायकवाड, टी.जी.माळी ,कांबळे सर विशाल वाघमारे ,अशोक शिंपले ,भारत शिंदे ,अशोक चिंचकर ,विनोद रणदिवे, रसूल खान, शहाजी गोडसे, रामदास गोसावी, अरबाज पठाण ,सी.टी. तांबडे, मुकेश वाघमारे ,यांच्यासह समता परिषद ओबीसी संघटना व चळवळीतील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन ओबीसी संघटनांच्या वतीने संतोष भोजने व सचिन डोरले यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.