देशभक्त न्युज -
शिव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी ऊर्फ मनोहर भिडे हे महाराष्ट्र मध्ये महापुरुषांचा खोटा इतिहास सांगून त्यांचा अपमान केला आहे. तरुण पिढीला भडकवून दंगली घडवण्याचे काम करत आहे. म्हणून भिडे च्या कार्यक्रमावर बंदी घालण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी धाराशिव , पोलिस अधिक्षक धाराशिव यांना देऊन मागणी करण्यात आली आहे . यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज,फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये भिडे तेढ निर्माण करत आहे याचे पडसाद विधानसभेमध्ये सुद्धा उमटले असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व सामाजिक राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत भिडेच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चे आंदोलन सुरू आहेत धाराशिव येथे दिनांक 04/ 08 /2023 रोजी मनोहर भिडे चा कार्यक्रम होणार आहे असे समजते या कार्यक्रमावर जिल्हा पोलीस प्रशासनाने तात्काळ बंदी घालावी जर त्यांचा उस्मानाबाद शहरामध्ये कार्यक्रम झाला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(खरात)पक्ष हा कार्यक्रम होऊ देणार नाही तो आम्ही उधळून लावू असे म्हटले आहे यावेळी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत तालुकाध्यक्ष धाराशिव संपत सरवदे यांच्या स्वाक्षरी आहेत.
