देशभक्त न्युज -
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मभुमीत डॉ.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समीती वाटेगाव २०२३च्या वतीने १०३व्या जयंतीचे औचित्य साधून "साहित्यरत्न जन्मभूमी पुरस्कार" उस्मानाबाद जिल्ह्याचे मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे यांना भव्य अभिवादन सभेच्या कार्यक्रमांत सन्मानित करण्यात आले.या वेळी सदरील पुरस्कार साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सुन सावित्रीमाई साठे, राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांच्या व मानवहित लोकशाही पक्षाचे प्रदेशअध्यक्ष आर.बी.साठे यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी उस्मानाबाद जिल्हा युवक अध्यक्ष किरण कांबळे, प्रसिद्धी प्रमुख रघुनाथ पाटोळे, वाशी तालुका महीलाअध्यक्षा आशाताई शिंदे,सदाशिव शिदे, तानाजी कांबळे यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल पाटुळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
