Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भाई नारायणराव लोमटे विद्यालयात 13 सप्टेंबर ऑपरेशन पोलो दिन साजरा

 भाई नारायणराव लोमटे विद्यालयात 13 सप्टेंबर ऑपरेशन पोलो दिन साजरा 




देशभक्त न्युज कळंब / - 

 भाटशिरपुरा येथील भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालयात हैदराबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समिती कळंबच्या वतीने दिनांक 13 सप्टेंबर ऑपरेशन पोलो दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश टेकाळे होते तर प्रमुख उपस्थिती मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समितीचे सचिव प्रकाश भडंगे, मार्गदर्शक मकरंद पाटील ,उपाध्यक्ष बंडू ताटे ,प्रसिद्धी प्रमुख माधवसिंग राजपूत ,सदस्य निलेश पांचाळ यांची होती कार्यक्रमाच्या सुरुवातीस थोर स्वातंत्र सेनानी हैदराबाद स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर समिती सचिव प्रकाश भडंगे यांनी आपल्या मार्गदर्शनात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा हा गौरवशाली इतिहास आहे याची पुढील पिढीस माहिती व्हावी यासाठी शासनाच्या स्तरावर व समितीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत या निमित्त विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना गौरवशाली इतिहासाची माहिती देण्यात येत आहे तसेच 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा होत आहे या निमित्त शालेय स्तरावर झालेल्या स्पर्धेत भाई नारायणराव लोमटे विद्यालयाने चांगले यश मिळवले आहे या बद्दल व उत्स्फूर्त सहभागाबद्दल कौतुक केले त्यांनी या प्रसंगी 13 सप्टेंबर रोजी पोलीस ऍक्शन, ऑपरेशन पोलो कारवाईची सुरुवात झाली यानंतर 17 सप्टेंबरला हैदराबाद संस्थान निजामाच्या तावडीतून मुक्त झाले याविषयी माहिती दिली या कार्यक्रमात मकरंद पाटील, माधवसिंग राजपूत ,बंडू ताटे यांनी विद्यार्थ्यांना मुक्ती संग्रामातील कळंब तालुक्याचे योगदान देव धानोरा व गौर या गावांनी जुलमी निजाम व रझाकार संघटना यांच्याविरुद्ध संघर्ष केला व प्राणाची बाजी लावली व हुतात्मे पत्करले याविषयी माहिती दिली कार्यक्रमात विद्यार्थिनी हर्षदा खापे, कार्तिक झोबाडे, ज्ञानेश्वर मस्के या विद्यार्थ्यांनी भाषणे केली केंद्रीय स्तरावर वक्तृत्व स्पर्धेत हर्षदा खापे व निबंथ स्पर्धेत वैष्णवी मस्के या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक हनुमंत पानढवळे यांनी तर आभार शरद सूर्यवंशी यांनी मानले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.