मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त कळंब येथे सूर मल्हार संगीत संध्या
देशभक्त न्युज - कळंब / -
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे यानिमित्त कलोपासक मंडळ कळंब च्या वतीने दिनांक 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध गायिका आसावरी देगलूरकर देसाई - पुणे यांची सूर् मल्हार संगीत संध्या शास्त्रीय ,उपशास्त्रीय तसेच सुगम संगीत मैफिलचे आयोजन विठ्ठल मंदिर जुने सराफ लाईन कळंब येथे संध्याकाळी 6.00
वाजता आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी साथ संगत संजय सुवर्णकार लातूर (तबला) व संवादिनी स्वरेशा पोरे कुलकर्णी (पुणे) यांची असणार आहे या प्रसंगी कळंब येथील ज्येष्ठ कलावंत प्राणेश विशंभर पोरे यांना अखिल भारतीय गंधर्व मंडळाचा जीवन कला गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यशवंत दशरथ कलोपासक मंडळ कळंब यांनी केले आहे
