समाज कल्याण जिप उस्मानाबाद आयोजित कळंब येथील दिव्यांग तपासणी शिबिरात 224 लाभार्थ्यांची तपासणी
देशभक्त न्युज - कळंब /-
समाज कल्याण जि.प. उस्मानाबाद यांच्या वतिने जिल्हात दिनांक 1 ते 14 सप्टेंबर या कालावधीत दिव्यांग व्यक्तीना संगनकिय प्रणाली द्वारे आॕनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्वीक ओळखपत्र (udid ) कार्ड देणे या साठी 13 सप्टेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे दिव्यांग तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिरात कळंब तालुक्यातील 91 गावांपैकी 58 लाभार्थी गावातून अस्थी व्यंग 129 ,मतिमंद 43, अंध 29, कर्णबधिर 21, बुटकेपणा 2 एकूण 224 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्माधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सय्यद, गटविकास अधिकारी चकोर ,आरोग्य विस्तार अधिकारी कराड एस. एस. दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष अच्युत मंडाळे यांची उपस्थिती होती या शिबिरात डॉ. बलराम पोतदार, डॉ. सुहास शिंदे, डॉ. अमोल खंडागळे ,डॉ. महेश पाटील, डॉ.रामकृष्ण लोंढे ,डॉ. मिरा कस्तुरे ,डॉ.शरद दशरथ ,श्रीमती यशोदा महातो यांनी दिव्यांगाची तपासणी केली.
