शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लातूर लोकसभा निरीक्षकपदी शंकरराव बोरकर यांची निवड
' होऊ द्या चर्चा ' या संकल्पनेच्या माध्यमातुन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शंकरराव (तात्या ) बोरकरांवर सोपवली मराठवाड्याची मोठी जबाबदारी
देशभक्त न्युज - मुंबई / -
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे , पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'होऊ द्या चर्चा ' ही संकल्पना संपूर्ण राज्यात व्यापक स्वरूपात राबविण्याचे ठरविले असुन त्या दृष्टिने दि . २ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबई येथील रंगशारदा सभागृहात आयोजित पक्षाच्या बैठकी मध्ये त्यांनी पक्षाचे नेतेमंडळी , पदाधिकारी यांना सखोल मार्गदर्शनही यावेळी केले व याचठिकाणी शंकरराव बोरकर यांची लातूर लोकसभा मतदार संघाच्या निरीक्षकपदी निवड करण्यात आली . तसेच बोरकर यांनी स्वतः लातूर लोकसभा मतदार संघात जास्तीत जास्त गावे व प्रभागामध्ये ' होऊ द्या चर्चा ' कार्यक्रमाचे नियोजन व निरीक्षण करावे . जास्तीतजास्त ठिकाणी स्वतः उपस्थित राहुन त्याबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर करावा .
या मतदार संघातील संपर्कप्रमुख , जिल्हाप्रमुख यांचे मोबाईल क्रमांकही त्यांना देण्यात आले असुन वेबीनारद्वारे संबंधितांना त्वरीत बैठक घेवून सुचना द्याव्यात व गावनिहाय कार्यक्रमांचे अंतिम नियोजन करावे असा सुचना देण्यात आल्या आहेत तर संदर्भ , मुद्दे व प्रचार साहित्याचा संचही देण्यात येणार आहे त्यानुसार मतदार संघाचे निरीक्षण करावे अशा प्रकारची सुचना देण्यात आली आहे .अशाप्रकारे लातूर लोकसभा मतदार संघाची मोठी जबाबदारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुन देण्यात आलेली आहे .
त्यामुळे शंकर ( तात्या ) बोरकर यांना पुन्हा एकदा एकप्रकारे मराठवाड्यात सक्रीय होण्याचे आदेशच देण्यात आले आहेत .
