Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

देवधानोरा व गौर येथे स्वतंत्र सेनानी यांचा सत्कार व त्यांचे अनुभव कथन कार्यक्रम संपन्न

 देवधानोरा व गौर येथे स्वतंत्र सेनानी यांचा सत्कार व त्यांचे अनुभव कथन कार्यक्रम संपन्न 



देशभक्त न्युज - कळंब  प्रतिनीधी / -

 मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समिती व महाराष्ट्र शिक्षण विभाग आयोजित जि. प .प्रशाला देवधानोरा व जि. प. प्रशाला प्राथमिक शाळा गौर येथे स्वातंत्र सेनानी यांचा सत्कार व अनुभव कथन व हुतात्मा स्मारकास अभिवादन कार्यक्रम  संपन्न झाला दिनांक 12 सप्टेंबर रोजी देवधानोरा येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक कुंभार बी. एस. हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश काका भडंगे मराठवाडा मुक्ती संग्राम समिती सचिव, मकरंद पाटील मार्गदर्शक, बंधू भाऊ ताटे, उपाध्यक्ष निलेश पांचाळ सदस्य यांची उपस्थिती होती याप्रसंगी स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण  बोंदर ,दिनकर  बोंदर,

 नारायण  मिरगणे, शहाजी वटाणे, सिद्धलिंग बिडवे ,बळी कीर्ते, बाजीराव बोंदर, भालचंद्र वाटाणे ,श्रीमती द्रोपती भोसले, सज्जनाबाई बोंदर, श्रीमती काशीबाई बोंदर, शिवाजी थोरात, श्रीमती प्रयागबाई लहाने यांचा यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक लक्ष्मण बोंदर यांनी आपले अनुभव कथन केले व देवधानोरा येथे रझाकारांनी गावची केलेली जाळपोळ अंदाधुंद केलेल्या गोळीबारात 13 हुतात्मे झाले ही घटना कथन केली याप्रसंगी गावकऱ्यांची उपस्थिती होती त्याचबरोबर दिनांक 13 सप्टेंबर रोजी गौर येथील जि. प प्राथमीक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक व  परिवारातील सदस्यांचा सत्कार शाल ,पुष्पहार देऊन करण्यात आला हा सत्कार मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समिती सचिव प्रकाश भडंगे, मार्गदर्शक मकरंद पाटील, उपाध्यक्ष बंडूभाऊ ताटे ,प्रसिद्धीप्रमुख माधव राजपूत ,सदस्य निलेश पांचाळ ,दीपक माळी यांच्या हस्ते. स्वातंत्र्य सैनिक किसन परशुराम दुधाळ, शेखुरामा बागल, पंढरी सखाराम अवधूत ,विश्वनाथ नरहरी लंगडे स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे कुटुंबीय कुसुम रंगनाथ घोंगडे ,मथुराबाई भीमराव देशमुख ,सोजरबाई बळीराम माळी, मालनबाई रामा गवळी ,गजराबाई मुरलीधर मोरे ,शोषणाबाई मुकुंद लंगडे यांचा सत्कार करण्यात आला स्वातंत्र्यसैनिकांनी  गौर गावात सात हुतात्मे झाले आहेत हा प्रसंग कथन केला कार्यक्रमात उपस्थित समिती सदस्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात झालेले बलिदान व संघर्ष हा इतिहास  नवीन पिढीला समजला पाहिजे त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन तसेच   स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे परिवार यांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन होत आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील मुंडे यांनी  तर सूत्रसंचालन बांगर एस बी यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.