अकलाख शेख यांची फंगल इंन्पेक्शन (गजकरण ) यावर औषध निर्मिती
देशभक्त न्युज - परंडा प्रतिनीधी / -
परंडा येथील रहिवासी असलेले अकलाख गफ्फार शेख यांनी फंगल इंन्फेक्शनवर डेव्हलपमेंट अँड इव्होल्युशन ऑफ फिल्म फॉर्मिंग स्प्रे ऑफ किटोकोनाझोल या औषधिची निर्मिती केल्याने त्यांना शासनाच्यावतीने या औषधीचे पेटंट प्रदान करण्यात आले आहे.
अकलाख शेख हे सोलापुर जिल्ह्यातील बार्शी येथील सोजर कॉलेज ऑफ फार्मसी खांडवी येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. जागतिक स्तरावरील फंगल इन्फेक्शन म्हणजेच गजकरण चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जालीम उपाय म्हणून त्यांनी हे औषध तयार केले आणि त्याच्यावर विविध प्रकारे संशोधन केले आहे. फंगाल इन्फेक्शन रोगावर शेख यांनी तयार केलेली डेव्हलपमेंट अँड इव्होल्युशन ऑफ फिल्म फॉर्मिंग स्प्रे ऑफ किटोकोनाझोल ही औषधी सर्वांसाठी उपयोगी ठरेल, असे त्यांनी सांगितले आहे.
हे औषध निर्माण करण्यासाठी त्यांना औरंगाबाद येथील वाय. बी. चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. एम.एच. देघान यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. शेख यांना मिळालेल्या पेटंट बद्दल सोजर कॉलेज ऑफ फार्मसी या संस्थेचे अध्यक्ष अरुण बारबोले व प्राचार्य सुजित करपे यांच्यासह समाजातील सर्व स्तरातील नागरिकांकडुन शेख यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शेख यांचे पुढील पीएचडी चे शिक्षण राजस्थान मधील जयपुर येथील सुरेश ज्ञानविहार युनिव्हर्सिटीमध्ये सुरू आहे.
