मग्रारोहयो च्या अंमलबजावणी संदर्भात निर्गमीत शासन आदेश डावलून पानगाव येथील मंजूर निधी इतरत्र पळविण्याचा कट
पानगावचा मंजूर निधी इतर गावी वर्ग केल्यास सरपंच माणिक ओव्हाळ यांनी प्रशासनास अमरण उपोषणाचा दिला इशारा
देशभक्त न्युज - कळंब प्रतिनीधी / -
कळंब तालुक्यातील पानगाव , जि . धाराशिव येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात निर्गमीत शासन आदेश पत्र क्रमांक - मग्रारो - २०२३ /प्र.क्र. ११५ / २३/ रो - ६ अ , दिनांक - ३१ मार्च २०२३ रोजीच्या नियोजन विभाग ( रोहयो ) शासन परिपत्रका मधील महात्मागांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजने ( मनरेगा ) अंतर्गत शासन निर्णय विविध मंजूर कामे यामधून पानगाव ता . कळंब येथे गाव मंजूर कामे यादी मधील अ.क्र. ७० वर रुपये ३० लक्ष रुपये निधी पानगाव येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ते व पेवर ब्लॉक बसविणे यासाठी मंजूर झाला असुन तो निधी ग्रामपंचायत पानगाच्या ठराव पत्रा व्यतिरिक्त इतर गावी /ठिकाणी वर्ग करण्याचे कांही मंडळीचे कटकारस्थान सुरु असुन प्रशासनाने तसे न करता तो मंजूर निथी पानगाव येथेच प्रस्तावित कामावर खर्च करण्यात यावा अन्यथा आपण अमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा सरपंच माणिक विठ्ठल ओव्हाळ यांनी दि १५ सप्टेंबर रोजी कळंबचे तहसिलदार मुस्तफा खोंदे यांना प्रत्यक्ष निवेदन देवून तहासिलदार कळंब यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंदजी फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,रोहोयोमंत्री संदीपानजी भूमरे , विरोधी पक्षनेता ,विधान सभा / विधान परिषद, आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर, यांना निवेदन पाठवले आहे व जिल्हाधिकारी धाराशिव , मुख्यकार्यकारी अधिकारी धाराशिव , उपविभागिय अधिकारी कळंब , गटविकास अधिकारी पंस . कळंब यांनाही प्रत्यक्ष निवेदन दिले आहे .
ओव्हाळ यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की , महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात निर्गमीत शासन आदेश पत्र क्रमांक - मग्रारो - २०२३ /प्र.क्र. ११५ / २३/ रो - ६ अ , दिनांक - ३१ मार्च २०२३ रोजीच्या नियोजन विभाग ( रोहयो ) शासन परिपत्रका मधील महात्मागांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजने ( मनरेगा ) अंतर्गत शासन निर्णय विविध मंजूर कामे यामधून मौजे पानगाव ता . कळंब येथे गाव मंजूर कामे यादी मध्ये अ.क्र. ७० वर रुपये ३० लक्ष रुपये निधी गाव अंतर्गत सिमेंट रस्ते व पेवर ब्लॉक बसविणे यासाठी मंजूर झाला असुन तो निधी ग्रामपंचायत पानगाव यांनी मासिक बैठकीत ठराव घेतलेल्या प्रस्तावित ठिकाणीच खर्च करावा .इतर गावी /ठिकाणी वर्ग न करता तो मंजूर निथी पानगाव येथेच खर्च करण्यात यावा सदर मंजूर निधी मधून यापूर्वी कधीही न झालेले गाव अंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम यामध्ये विनायक पवार ते रघुनाथ ठोंबरे यांचे घर , शेषेराव चव्हाण ते प्रशांत चव्हाण यांचे घर , सुब्राव जाधव ते अर्जुन वाघमारे यांचे घर ,ज्योतीबा पवार ते परसराम कदम यांचे घर येथील सिमेंट रस्त्याच्या कामासाठी प्राप्त ३० लक्ष रुपये निधी खर्च करण्यात येणार असुन ग्रपंचायत च्या दिनांक २९ / ८ /२०२३ रोजीच्या मासिक बैठकीत तसा ठराव सर्वानुमते घेण्यात आला आहे .
परंतु प्रशासनाची दिशाभुल करून राजकीय व्देषापोटी, मनात दुषाग्रह ठेवून व गावात सरपंचामुळेच मंजूर काम इतर गावात वर्ग करण्यात आले असा अप्रचार करून गावात शांततेचा भंग करू पहाणाऱ्या प्रवृत्तीचा बंदोबस्त व्हावा व अशा प्रकारस आळा बसावा यासाठी या प्ररकरणी संबंधीत प्रशासन , अधिकारी , कर्मचारी यांनी सदरीलं मंजूर काम कोणाच्या सांगण्यावरून , राजकीय किंवा इतर दबावाला बळी पडुन इतर गावात / ठिकाणी वर्ग करू नये जेणे करुन येथील गावच्या सर्वांगीण विकास कामास अडथळा निर्माण होवू नये ,जर प्रशासन , अधिकारी , कर्मचारी यांनी कोणाच्या खोट्या भूल थापाला , अमिषाला बळीपडुन हा निधी इतर गावी / ठिकाणी वर्ग केल्यास मी संबंतीत कार्यालयाच्या समोर गावच्या सर्वांगीन विकासाच्या विषयी बेमुदत उपोषणास बसणार आहे .याची प्रशासनाने गांभीर्य पूर्वक नोंद घ्यावी अन्यथा निर्माण होणाऱ्या परिणामाची सर्वश्वी जबाबदारी प्रशासनाची असेल असा सज्जड इशाराही सरपंच ओव्हाळ यांनी दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे .
