Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कळंब येथील वीरभूषण राजमाने परिवाराच्या गौरी पुढे लग्न सोहळा देखावा महिला भगिनीमध्ये कुतूहल व कौतुक

 कळंब येथील वीरभूषण राजमाने परिवाराच्या गौरी पुढे लग्न सोहळा देखावा महिला भगिनीमध्ये कुतूहल व कौतुक                  



देशभक्त न्युज - माधवसिंग राजपुत कळंब / -

ज्येष्ठा गौरीचा सण हा उत्साहाचा व आनंदाचा सण या साठी महिला भगिनीची लगबग असते कुटुंबासाठी सुख, शांती व समृद्धी साठी घरोघरी आराधना केली जाते ज्येष्ठा गौरीचे आगमन व पाहुणचार यात आपण कुठे कमी पडणार नाहीत याची काळजी घेतली जाते घर स्वच्छता, सडा ,रांगोळी गौरीसाठी नैवेद्य, पूजा, आरती याबरोबरच आकर्षक सजावट याला अन्याय साधारण महत्व आहे आपल्या गौरीपुढे करण्यात येणारी सजावट सुंदर आकर्षक तसेच त्यातून काही संदेश मिळावा असा प्रयत्न केला जात असतो धार्मिक ,सामाजिक, संस्कृती ,राष्ट्रीय विषयावर देखावे सादर केली जातात असाच एक देखावा कळंब शहरातील मुंडे गल्ली येथील वीरभूषण राजमाने कुटुंबाने सादर केला आहे हा देखावा लग्न संस्कार विधीचा आहे लग्न संस्कार हा जीवनातील सोळा संस्कारापैकी एक आहे हा एक प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाची घटना असते राजमाने कुटुंबीयांनी आपल्या ज्येष्ठा गौरी पुढे लग्नविधीचा संपूर्ण प्रसंग सादर केला असून लग्नप्रसंगी सुपारी फोडणे ,साखरपुडा, हळद फोडणी ,हळद लावणे बांगड्या भरणे, स्वागत व लग्न मंडप यात वधूला देण्यासाठी संसार उपयोगी वस्तू, आहेर, रुकवत वाजंत्री एवढेच काय लग्न कार्यासाठी येणाऱ्या पाहुणे मित्रपरिवार यांच्या वाहनाची पार्किंग व्यवस्था शुभमंगल पार पडल्यानंतर सत्यनारायण पूजा ,लग्न विधी प्रसंगी मंगलाष्टके त्याचबरोबर लग्न लावणारे ब्राह्मण, सप्तपदी जेजुरी दर्शन आधी चा समावेश या देखाव्यात असून परिपूर्ण लग्न समारंभ या देखाव्यातून उभा केला आहे या देखाव्यातील प्रत्येक वस्तू तयार करण्यासाठी राजमाने कुटुंबीयांनी बारकाईने व लक्षपूर्वक सजावटीत काही कमी पडणार नाही याची दक्षता घेतली असून यासाठी गेल्या दोन महिन्यापासून तयारी सुरू होती यापूर्वी बारा बोलतेदार हा देखावा व गत्तवर्षी "लागिर झालं जी " या  दूरदर्शन मालिकेतील शितल - अजय यांचा शुभ विवाह हा देखावा सादर केला होता यामुळे राजमाने कुटुंबीय यावर्षी कोणता देखावा सादर करणार याची उत्सुकता होती यावर्षीच्या या देखाव्याचे महिला मधून कौतुक झाले देखावा बघण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.