ईटकूर येथील शिवनेरी गणेश मंडळा कडुन अन्नदान
इतर खर्चाला फाटा देत विविध उपक्रम राबवित २४ व्या वर्षातही मंडळाची परम्परा कायम
देशभक्त न्युज - ईटकूर प्रतिनिधी / -
ईटकूर येथे गणपती बप्पाच्या अगमनाने सर्वत्रच वातावरण प्रसन्न असुन प्रत्येक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची अगदी मोठी धावपळ व कामाची लगबग पहावयास मिळत आहेत .
आपण गणेशभक्तां समोर नविव कांहीतरी ठेवून आपल्या मंडळाचा ठसा आपण अगळा वेगळा निर्माण करू अशीच अनेक गणेशमंडळात स्पर्धा लागल्याचे चित्र आहे .
येथील शिवनेरी गणेश मंडळही यात मागे नसुन या मंडळाचे यंदाचे २४ वे वर्ष सुरु असुन प्रशासन स्तरावरील सुचना व एक सुजान नागरिक म्हणून कायदा सुव्यवस्था विना गालबोट संभाळणे हे आपले कर्तव्य मानून या मंडळाने इतर अनाहुत खर्चाला कोणताही मोठा डामडौल न करता गणपती बप्पाच्या देखण्या आकर्षक मुर्तीची प्रतिष्ठापणा करून येणाऱ्या सर्व गणेशभक्तांसाठी महाप्रसासाद म्हणून गरमागरम वेगवेगळे जेवणाचे चविष्ट पदार्थ ठेवून अन्नदान कार्यक्रम मोठ्या उत्साहाने राबवितात .
मंडळाकडुन राबविल्या जाणाऱ्या उपक्रमासाठी शिवनेरी गणेश मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण अरूण आडसुळ , दत्ता गंभीरे, बिभीषण आडसुळ, बालाजी पांढरे, बापु माने,राकेश चव्हाण, अशोक गंभीरे, अनिकेत पांढरे, काकासाहेब बावळे, बंडु चाळक, महादेव शिंदे, अक्षय कस्पटे, कुमार देसाई, समाधान जाधव, विक्रम पाटील, राजूभैय्या, भैय्या जाधव आण्णा चव्हाण बारकूल भैय्या व इतर मंडळाचे पदाधिकारी , गणेशभक्त परिश्रम घेतात .
