उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल बेताल वक्तव्या प्रकरणी पदाधिकारी आक्रमक
कळंब येथिल शिवाजी चौकात पडळकरांच्या बॅनरवरील प्रतिमेस जोडे मारो आंदोलन
देशभक्त न्युज - कळंब प्रतिनीधी / -
भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल बेताल वक्तव्य केले त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आ .पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत .
