Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लॉंग मार्च मधील आंबेडकर वाद्यांनी जातीवादी पुढाऱ्या पासून सावध राहा : रिपाई नेते दादासाहेब ओव्हाळ

 लॉंग मार्च मधील आंबेडकर वाद्यांनी जातीवादी पुढाऱ्या पासून सावध राहा : रिपाई नेते दादासाहेब ओव्हाळ





मिरज तालुक्यातील बेडग येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान पाडल्या प्रकरणी आंबेडकरवादी समाज बांधवांचा निघाला घटनेच्या निषेधार्ध लाँग मार्च 


लाँग मार्चला रिपाई पक्षाच्या वतीने दिलेल्या पाठिंबा पत्राद्वारे ओव्हाळ यांच्याकडुन सरकार आणि सोबत असणारे आंबेडकरवादी पक्ष , मित्रपक्ष यांच्या विरुद्ध एल्गार 


देशभक्त न्युज - सातारा प्रतिनीधी / -


बेडग ता. मिरज येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान पाडल्या प्रकरणी या घटनेच्या निषेधार्थ येथील आंबेडकर वादी समाजातील महिला , पुरुषांनी लॉग मार्च काढला असुन हा काढण्यात येणारा लॉन्ग मार्च करू नये म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती कमान पूर्ववत करू असा दिलेला शब्द न पाळल्यामुळे संबंधित बेडग येथील आंबेडकरी अनुयायांचा पुनश्च लॉग मार्च सुरू झालेला आहे त्या लॉंग मार्चला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या वतीने पूर्णतः समर्थन देत असल्याचे प्रसिद्धी पत्रक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे प्रदेश उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हा अध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी काढले असुन प्रसिद्धी पत्रकात त्यांनी असे म्हटले आहे की , एकंदरच भाजप व त्यांचे असणारे मित्रपक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच रिपाई आठवले गट व इतर त्यांचे मित्र पक्ष हे जाणीवपूर्वक आंबेडकर विचारांच्या व इतर महापुरुषांच्या विचारधारेच्या विरोधामध्ये सातत्याने काम करत आहेत त्यामुळे अशा जातीवादी व कपटी सरकारच्या विरोधामध्ये सध्या जो लॉंग मार्च चालू आहे तो लॉंग मार्च हा मंत्रालयावर न धडकता तो राजभवनावरती धडकला पाहिले व सदरील प्रकरणाचे निवेदन हे राज्यपाल यांना देण्यात यावे. ज्या गावाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची गरज नाही ज्यांना डॉ . बाबासाहेबांच्या नावाची अॅलर्जी आहे जी विचारसरणी बाबासाहेबांना नाकारत आहे त्यांचा आंम्ही पक्षाच्या वतीने धिक्कार करीत आहोत .

 बेडक येथील सरपंच , ग्राप . सदस्य आणि जिल्हा प्रशासन तसेच पालकमंत्री सुरेश खाडे, महाराष्ट्र सरकार त्यांच्या सोबत असणारे मित्र पक्ष यांचाही आंम्ही पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे . बेडगवासीय आंबेडकरी समुदायाने जे मिशन हाती घेऊन जी ही सुरुवात केलेली आहे त्या तुमच्या मिशनला आमच्यापक्षाचा पूर्णता पाठिंबा आहे परंतु आपल्याला एक साल्ला असुन तुमच्या कडुन एक अशी अपेक्षा आहे की , आपल्या मधील आपल्या विरोधातील खरा शत्रू कोण आहे हे ओळखण आज काळाची गरजेचे आहे . कारण खरा शत्रू हा भाजप आणि त्याचे मित्र पक्ष असणारे सरकार आहे त्यामुळे भाजपला सहकार्य करणारे आंबेडकरी वादी मधील काही दिखावू नेत्यांच्या कार्यकर्त्यांपासून सुद्धा बेडग मधल्या आंबेडकरीवाद्यांनी सावध राहायला पाहिजे आणि अशा लोकांच्या पासून सुद्धा मदत घेणं नाकारले पाहिजे हे लोकांची मदत म्हणजे एक प्रकारे भाजपच्या लोकांकडून घेतलेली मदत आहे त्यामुळे बेडग मधील आंबेडकर वादी जनतेने अशा लोकांचे पाणी सुद्धा वर्ज करावे. तरच खऱ्या अर्थाने लॉन्ग मार्च सार्थक ठरणार आहे नाहीतर ज्या आठवले गटाचे कार्यकर्ते रस्त्याने येऊन भेटतात ते त्यांच्या नेत्याला सुद्धा सांगू शकत नाहीत की सरकार मधून बाहेर पडा किंवा आम्ही कार्यकर्ते आठवले बरोबर नाही असे ठामपणे बोलू शकत नाहीत तुम्हाला आंबेडकरवादी म्हणून मदत करत आहेत परंतु ती मदत ही भाजपच्या नेत्यांकडून घेतली जाते एवढे मात्र निश्चित आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्यातील बिभीषण आपण ओळखला पाहिजे आणि अशा बिभीषणाला वेळी बाजुला सारले पाहिजे अशा प्रकारचे सडेतोड आवाहन रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिलेल्या पाठिंबा पत्राच्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे .यावेळी महाराष्ट्र प्रदेश संघटक कैलास भाऊ जोगदंड , महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रशांत सर्वगोड , युवक जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे, जिल्हा सचिव किरण बगाडे ,जिल्हा सरचिटणीस संतोष जाधव , जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पवार, सातारा तालुकाध्यक्ष मदन मदाळे , कराड तालुका अध्यक्ष मुकुंदजी माने, IT सेल जिल्हाध्यक्ष विशाल भोसले , कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी. व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.