आई, बहिण, पत्नी, मुलगी, सून या अनेक रूपांमध्ये गौरी शक्ती रूपाने आपल्या मध्ये नेहमीच नांदत असते, नारी शक्तीचा सन्मान करा - आ . राणाजगजितसिंह पाटील
गौरी पूजनाच्या दिवशी आ . पाटलांनी घेतले गौरी दर्शन
देशभक्त न्युज - धाराशिव प्रतिनीधी / -
गौरीपूजन म्हणजे अत्यंत उत्साह, आनंद आणि पावित्र्याचा सण. महाराष्ट्रात विविध ठिकाणी, विविध पद्धतीने, कुलाचार आणि परंपरांप्रमाणे गौरींची स्थापना होते. या गौरीचे प्रत्येक स्वरूप अत्यंत प्रसन्न आणि समृद्ध करणारे आहे.
खरं पाहिलं तर आई, बहिण, पत्नी, मुलगी, सून या अनेक रूपांमध्ये ती शक्ती रूपाने आपल्या मध्ये नेहमीच नांदत असते, तिचा सन्मान करण्याचा संकल्प घेणे हेच गौरींचे खरे पूजन असल्याचे आ . पाटलांनी म्हटले आहे .
