मोहा फाटा ते बावी या उखडलेल्या रस्त्यावर सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिंदे बसणार उपोषणास
नुकत्याच झालेल्या कामाच्या रत्यावर भले मोठमोठे खड्डे पडल्याने गुत्तेदार व अधिकारी यांनी केलेल्या कामाच्या गुणवत्तेचा महाप्रताप शिंदे यांच्या तक्रारीने चव्हाट्यावर
देशभक्त न्युज - वाशी प्रतिनिधी / -
वाशी तालुक्यातील मोहा फाटा ते बावी येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून पाच महिन्याच्या आतच डांबरीकरण रस्ता उखडून खड्डे पडायला लागले आहेत त्यामुळे शासनाचे करोडो रुपये सबंधित अधिकाऱ्याच्या संगनमताने खड्डयात गेलेत की कोणा कोणाच्या खिशात गेलेत याची चर्चा वाशी तालुक्यात रंगू लागली असून तालुका व जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे कंत्राट दाराकडून डांबरीकरण रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याने ग्रामस्थ सह प्रवाशातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे याच पार्श्वभूमीवर बावी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिंदे हे आज पासुन मोहा फाटा ते बावी या रस्त्यावर उपोषणास बसणार आहेत त्यांनी या निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामासंदर्भात तालुका बांधकाम व जिल्हा बांधकाम विभागाला दि . ८ ऑगस्ट २०२३ रोजी तक्रार देण्यात आली होती त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने दि . २२ सप्टेंबर रोजी तक्रारी निवेदन देवून दिलेल्या निवेदनावर कारवाई न झाल्यामुळे आपण सोमवार दि .२५ सप्टेंबर रोजी उपोषणास बसणार असल्याचा इशारा शिंदे दिला आहे .
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की , मोहा फाटा ते बावी. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून सध्या तो रस्ता उखडलेला आहे तो रस्ता नव्याने तयार करण्यात यावा तसेच संबंधित कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी परंतु त्यांच्या सदर अर्जाची विभागाने दखल न घेतल्यामुळे त्याच रस्त्यावर आज पासुन ते आमरण उपोषणास बसणार आसुन यास सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
