प्रसेना प्रतिष्ठानच्या पदाधिकारी, सदस्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
देशभक्त न्युज - धाराशिव प्रतिनीधी / -
विविध सामाजिक कार्यक्रम, उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या शहरातील प्रसेना प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप बनसोडे यांनी नुकताच क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे. त्यानंतर प्रतिष्ठानच्या अन्य पदाधिकारी, सदस्यांसह सांची प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनीही जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या उपस्थितीत शहरातील क्रांती चौक येथे पक्षप्रवेश केला आहे.
धाराशिव शहरात प्रसेना प्रतिष्ठान मागील बारा वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, उपक्रम राबवित आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप बनसोडे व अन्य पदाधिकारी, सदस्यांनी प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची पक्षबांधणी व पक्षवाढीसाठी पक्षात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या उपस्थितीत बुधवार, 20 सप्टेंबर रोजी क्रांती चौक येथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रतिष्ठानच्या कुणाल मस्के, अभिजीत हौसलमल, भाग्यश्री माळाळे, प्राजक्ता मोरे, सांची प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद हावळे यांच्यासह अन्य सदस्य, पदाधिकार्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिग्वीजय शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, कळंब धाराशिव विधानसभेचे अध्यक्ष मोहन मुंडे, शहराध्यक्ष सचिन तावडे, मच्छिंद्र क्षीरसागर, जमाल महेबुब तांबोळी, शमशोद्दीन जमादार, सुनील साळुंके उपस्थित होते. यावेळी सचिन तावडे, सुनील साळुंके, दिग्वीजय शिंदे, महेंद्र धुरगुडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर बनसोडे यांनी तर सूत्रसंचालन राहुल जगताप तर आभार संदीप बनसोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्नील बनसोडे, दादासाहेब मोटे, रूपेश बनसोडे, जीवन भालशंकर, प्रज्योत बनसोडे, नागराज साबळे, राज कसबे, धन्यकुमार क्षीरसागर, शैलेंद्र शिंगाडे, सचिन डोंगरे, सुमीत क्षीरसागर, प्रसाद माने, पृथ्वीराज सरवदे, कल्पेश बनसोडे, प्रीतम शिंगाडे, गणेश पेठे, आदींनी परिश्रम घेतले.
