Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पंकजाताई मुंढे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेचे परंडा येथे जंगी स्वागत

 पंकजाताई मुंढे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेचे परंडा येथे जंगी स्वागत 

        


देशभक्त न्युज - परंडा / -   

श्रावण महिन्यामध्ये राज्यभरातील धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव, संघर्षकन्या पंकजाताई मुंढे यांचे शिवशक्ती परिक्रमा यात्रा निमित्ताने परंडा येथे दिनांक ९ सप्टेंबर २३ रोजी छ. शिवाजी महाराज चौकात आगमन होताच मा . आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या उपस्थितीत जंगी स्वागत व पुष्पवृष्टी करण्यात आली. " कोण आलीरे कोण आली , महाराष्टाची वाघीण आली ". अशा जय घोषात परंडा शहर दुम दुमुनगेले .        

 यावेळी व्यासपिठावर परंडा तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने पंकजाताई मुंढे यांचे मोठ्या जल्लोषात, स्वागत करण्यात आले‌. जिल्हाध्यक्ष संताजी पाटील-चालुक्य, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश‌ का. सदस्य ॲड. जहीर चौधरी‌, मा . जिल्हाध्यक्ष नितीन काळे तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.