कन्हेरवाडी ते मांडवा या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करणारे अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करा
देशभक्त न्युज - उस्मानाबाद / -
उसमानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये कन्हेरवाडी ते मांडवा या रस्त्याचे काम सुरू आहे हे काम अतिशय निकृष्ट दर्जेचे करण्यात आलेले असून निकृष्ट दर्जाचे काम करणारे अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)पक्षाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली आहे. यावेळी निवेदनात म्हटले आहे की,हा (राज्य महामार्ग) रस्ता वाशी कडे जाऊन कळंब ते येरमाळा या रस्त्याला जोडतो म्हणून या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात वाहनाची -हदारीअसते गेली अनेक वर्षापासून हा अतिशय खराब झालेला होता म्हणून राज्य सरकारने या रस्त्याचे काम करण्यासाठी स.न.2022 /23 मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूरी देऊन काम चालू केले आहे परंतु या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने गुत्तेदार व या कामावरील इंजिनियर या दोघांच्या संगनमताने अशा प्रकारे काम केले जात आहे या कामात रस्त्याचे खोदकाम न करता, चांगल्या प्रकारच्या मुरुम व दगड, रस्त्यावर अंथरूण त्याच्यावर पाणी टाकून दबाई न करणे तसेच मोठ्या जाडीची खडी न वापरणे म्हणजेच अंदाजपत्रकातील नियमाप्रमाणे काम करण्यात आलेले नाही. पूर्वीच्या जुन्याच माती मिश्रित रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले आहे हा रस्ता सात ते आठ किलोमीटर अंतराचा आहे अशाप्रकारे जर बोगस काम झाले तर हा रस्ता फार काळ टिकणार नसून शासनाचे लाखो रुपये वाया जातील असे बोगस काम करून संबंधित अधिकारी आणि गुत्तेदार हे स्वतःचे खिशे भरत आहेत
कन्हेरवाडी ते मांडवा या डांबरीकरणाच्या रस्त्यामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा करून निक्रष्ठ दर्जाचे काम करणारे अधिकारी व गुत्तेदार यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी.अन्यथा पक्षाच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा राजाभाऊ राऊत यांनी दिला आहे.
