येरमाळ्यातील मयत शहाजी कदम यांच्या परिवाराचे पालकमंत्री डॉ.सावंत यांच्याकडून सांत्वन
कदम यांच्या मुलांच्या शिक्षणाची स्वीकारली जबाबदारी
देशभक्त न्युज - येरमाळा / -
पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत हे दि . ११ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी कळंब तालुक्यातील येरमाळा येथे भेट देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी उपोषण करतांना ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री शहाजी कदम यांनी आत्महत्या केली. कदम यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी पालकमंत्री डॉ. प्रा . तानाजीराव सावंत आले होते . त्यांनी मयत शहाजी कदम यांच्या कुटूंबियांची भेट घेतली आणि त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करुन शहाजी कदम यांच्या मुला , मुलींचे पालकत्व त्यांनी स्वीकारून
त्यांचे शैक्षणिक तसेच त्यांना पुढे रोजगार उपलब्ध करून देऊन मुलामुलींच्या वैवाहिक व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारली. तसेच त्यांनी परिवाराशी संवाद साधला. मयत शहाजी कदम यांच्या परिवाराला कुठलीही अडचण असल्यास त्यांनी थेट संपर्क साधावा असे पालकमंत्री सावंत यांनी सांत्वन भेटीच्या वेळी सांगितले.
