मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे याबाबत वाठवडा ग्राप . च्या ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर
सरपंच सुरेखा बालाजी आल्टे यांच्या अध्यक्षेतेखाली ग्रामसभा खेळी - मेळीच्या वातावरणात संपन्न
देशभक्त न्युज - कळंब / -
कळंब तालुक्यातील वाठवडा ग्रामपंचायतच्या वतीने गावच्या विकासात्मक दृष्टी कोणातुन सरपंच सुरेखा बालाजी आल्टे यांच्या अध्यक्षेतेखाली ग्रामसभेचे दि ११ सप्टेंबर रोजी आयोजन केले होते . त्यात सर्वानुमते मराठी समाजास जातीचे कुणबी प्रमणपत्र मिळावे याबबतचा ठराव घेण्यात आला .
आयोजित केलेल्या ग्रामसभेस उपसरपंच नंदा व्यंकट साळुंके यांच्यासह ग्राप सदस्य , ग्रामसेवक डी . बी . लाडे गावचे ग्रामस्थ यांची प्रमुख उपस्थिती होती .
सध्या महाराष्ट्रात गाजत असलेला मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी सर्वत्र मोर्चे अंदोलने सुरु असुन मराठा समाजाच्या मागणीस पाठींबा असल्या बाबातचा ठरावच वाठवडा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत घेण्यात आला असुन या ठरावाच्या प्रति सोबत ग्रापने
तहसिलदार कळंब यांना पत्राव्दारे कळविले आहे . याची प्रत कळंब तहसिल कार्यालयाचे पेशकार शिंदे यांना देताना प्रा . बालाजी आल्टे सर व ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती .
