कळंब क्रिडा स्पर्धेत छ.शिवाजी महाविद्यालयाचे घवघवीत यश
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने केले अभिनंदण
देशभक्त न्युज - कळंब / -
दि.११/०९/२०२३ रोजी कळंब तालुक्यात 'तालुका स्तरीय विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन' करण्यात आले होते. या स्पर्धा डिकसळ येथील क्रिडा मैदानावर पार पडल्या.या स्पर्धेमध्ये छ.शिवाजी महाविद्यालयाने सहभाग नोंदवून विविध क्रिडा प्रकारामध्ये यश संपादन केले.यामध्ये तांबवे शाहीर दाजिबा या स्पर्धकाने शंभर मीटर व पंधरा मीटर धावणे या क्रिडा प्रकारात तसेच चार बाय चारशे रिले क्रिडा प्रकारामध्ये तालुक्यात प्रथम आला.बोराडे विनायक त्रिंबक चारशे मीटर धावणे व लांब उडी व चार बाय चारशे रिले या क्रिडा प्रकारामध्ये तालुक्यात प्रथम आल्रा.तांबोळी जिशान ईब्राहीम चारबाय चारशे रिले प्रथम व दोनशे मीटर धावणे तृतीय क्रमाने यश संपादन केले. करडे अनिकेत विक्रम चार बाय चारशे रिलेमध्ये प्रथम व शिंदे आदित्य बालाजी चार बाय चारशे रिले क्रिडा मध्ये यानी प्रथम क्रमाचे यश संपादन केले.या सर्व विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे सचिव शिवाजी (आप्पा) कापसे अध्यक्ष. श्याम (नाना) खबाले व कोषाध्यक्ष बाळकृष्ण गुरसाळे भाऊ कॉलेजचे प्राचार्य.शशिकांत जाधव तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले.क्रिडा शिक्षक प्रा.राजाभाऊ चोरघडे व प्रा.नामदेव तोडकर यानी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
