मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास नव्या पिढीला माहित होणे गरजेचे - साहित्यिक युवराज नळे
लढा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा सांस्कृतिक वार्तापत्र विशेष अंकाचे कळंब येथे प्रकाशन संपन्न
देशभक्त न्युज - कळंब / -
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा 75 वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे यानिमित्त मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा पुढील पिढीला माहित व्हावा यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे मराठवाडा हैदराबाद संस्थानात होता यामुळे खरे स्वातंत्र्य 17 सप्टेंबरला आपणास मिळाली आहे निजाम व त्याची पाठराखण करणारी करणारी रझाकार या संघटनेने जुलूम ,दडपशाही केली याला विरोध करण्यासाठी पुढे आलेले अनेक हुतात्मे झाले देव धानोरा, चिलवडी, नंदगाव ,गौर या गावकऱ्यांनी मोठ्या धैर्याने याचा सामना केला हा इतिहास नव्या पिढीला माहित झाला पाहिजे यासाठी आपण माहिती संकलित करून पुस्तक लिहत असून लवकरच त्याचे प्रकाशन होत आहे यामुळे नवीन माहितीत भर पडणार आहे असे विचार साहित्यिक युवराज नळे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम महोत्सव समिती कळंब आयोजित लढा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा हिंदूंचा विजय या विषयावर संस्कृती वार्तापत्र या मासिकाने विशेषांक काढला आहे या विशेषांकाच्या प्रकाशन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठवाडा मुक्ती संग्राम महोत्सव समिती कळंब चे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष यशवंत दशरथ होते तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वातंत्र्यसेनानी लक्ष्मणराव उर्फ भैय्यासाहेब देशमुख मांडवेकर यांची उपस्थिती होती या प्रसंगी मंचावर समिती सचिव प्रकाश भडंगे, नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक सी.
एस. वाघमारे मंडलाधिकारी मटके ,अव्वल कारकून शिंदे तहसील कार्यालय कळंब यांची उपस्थिती होती याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक लक्ष्मणराव देशमुख मांडवेकर यांनी मुक्ती संग्रामातील अनेक आठवणी सांगितल्या निजामाच्या दडपशाही मुळे चार लोक एकत्रित येणे अवघड होते आज आपण मुक्त आहोत तरुणांची संख्या मोठी आहे स्वातंत्र सैनिकांनी दिलेले योगदान आपण विसरता कामा नये असे सांगितले व आर्य समाजाच्या चळवळीत गणपतराव कथले यांच्या नेतृत्वात कळंब परिसरात सत्याग्रह झाले तसेच हैदराबाद स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात हा लढा तीव्र झाला असे सांगितले याप्रसंगी यशवंत दशरथ प्रकाश भडंगे यांनी आपले विचार व्यक्त केले व त्यांनी मुक्ती संग्राम महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे यात सहभाग घ्यावा असे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अरविंद खांडके, यांनी सूत्रसंचालन बंडू ताटे यांनी व आभार राजेंद्र बिक्कड यांनी मानले मराठवाडा मुक्ती लढा महोत्सव समितीचे मकरंद पाटील, अनिल यादव , महेश जोशी ,किरण फल्ले, माधव सिंग राजपूत ,संदीप कोकाटे, निलेश पांचाळ, वीर बाळासाहेब कथले, परमेश्वर पालकर यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
