ईटकूरात गणेश मंडळांच्या मिरणूकात अवतरले गणपती आणि हनुमान .
जयहिंद गणेश मंडळामध्ये गणपती गजानन आणि जाणताराजा गणेश मंडळामध्ये रामभक्त हनुमान या हुबेहुब वेशभूषेतील कलाकारांनी सर्वांचे लक्ष वेधले .
देशभक्त न्युज - ईटकूर प्रतिनीधी / -
गणपती बप्पाचे आगमन म्हणजे तरुणाईसह सर्व लहान थोर गणेशभक्तांचे प्रतिष्ठापणा ते विसर्जन या कालावधीत गणेश मंडळाचे पदाधिकारी , गणेशभक्त यांची मोठी धामधुम असते .
प्रत्येक गणेश मंडळाच्या वतीने अन्नदान , सांस्कृतिक कार्यक्रम , विविध स्पर्धा यांचे आयोजन केले जाते . हे उपक्रम राबवित असताना येथील जाणताराजा गणेश मंडळाने दि . २७ रोजीच्या विसर्जन मिरवणूकीत विविध वेशभूषामधील शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातुन मिरणूकीची शोभा वाढवली तर हुबेहुब रामभक्त हनुमानाची सदैव वेशभूषेतुन भूमिका भूमिका साकारणारा तालुक्यातील गौर येथेल तानाजी या बहुरुपी कलाकाराला आणून सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला .
तर जयहिंद गणेश मंडळाने दि . २८ रोजी सकाळी ढोल ताशाच्या गजजारात गणपतीच्या आकर्षक मुर्ती सह ट्रॉक्टरच्या हेडवर गणपत्ती बप्पाची वेशभूषा साकरलेला परिसरातील वाकडी येथिल विशाल कोल्हे याकलाकाराला बसवून भव्य मिरणूक काढली वेशभूषेतील गणपती गजाननाने सर्व गणेश भक्तांचे यावेळी लक्ष वेधले .
ईटकूरातील सर्वच गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाच्या सुचनेनुसार अगदी नियमांचे उल्लंघन न करता सर्व गणपती बप्पांचे पोस्टे कळंब यांच्या माध्यमातुन मिळालेल्या तारखेत " गणपती बप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या " अशा जयघोषात विसर्जन केले .
पोलीस बंदोबस्तासाठी कर्तव्यावर असणारे पोबीट अमलदार बाळासाहेब तांबडे , पोपट जाधव , गणेश वाघमोडे , मायंदे , चेडे ,होमगार्ड कोठावळे वगैरेंना गणपती प्रतिष्ठापना ते विसर्जन कालावधीत कळंब पोस्टचे पोनि. सुरेश साबळे यांच्या मार्गदशनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता .



