किल्लारी भूकंप ३० वर्ष पूर्ती निमित्त प्रतिवर्षा प्रमाणे सास्तुर येथे सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न
देशभक्त न्युज - धारशिव प्रतिनीधी / -
३० वर्षांपूर्वी जिल्ह्याला हादरून टाकणाऱ्या किल्लारी, सास्तुर व परिसरातील भूकंपात हजारो नागरिकांना जीव गमवावा लागला होता. तीव्र भूकंपामुळे अनेक गावे बेचिराग झाली होती.त्या काळात डॉ . पद्मसिंह पाटील हे पालकमंत्री होते. त्यावेळी त्यांनी या परिस्थितीतून नागरिकांना सावरण्यासाठी ते स्वतः उमरगा येथे जवळपास दीड महिना थांबून होते.. मुंबई येथील तेरणा हॉस्पिटलची टीम घेऊन आपण स्वतः देखील काही दिवस येथे थांबलो असल्याच्या आठवणीना आ . पाटील यांनी उजळा दिला .आपल्या भागातही या अनुषंगाने स्मारक आहे त्या ठिकाणी उद्यान आणि अभ्यासिका करण्यात येणार असल्याची आ . पाटील यांनी यावेळी माहिती दिली .आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह आमदार ज्ञानराज चौगुले, भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, पाटील, नितीन काळे, राहुल पाटील सास्तुरकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
