कामगार कल्याण केंद्र कळब च्या वतीने आयोजित सर्व रोग निदान शिबिरात 75 कामगारांची आरोग्य तपासणी
देशभक्त न्युज - कळंब प्रतिनीधी / -
कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय लातूर अंतर्गत कामगार कल्याण केंद्र कळंबच्या वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त विशेष कार्यक्रमांतर्गत दिनांक 6 ऑक्टोबर रोजी व दत्त मंदिर बसआगार कळंब येथे कामगारासाठी सर्व रोग निदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात 75 कामगाराची आरोग्य तपासणी करण्यात आली शिबिराचे उद्घाटन कळंब बस आगार प्रमुख बालाजी भारती व वारकरी साहित्य परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष ह .भ. प .सुनीता देवी महाराज अडसूळ, यांच्या हस्ते संपन्न झाले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केंद्रप्रमुख उमेश जगदाळे , धाराशिव - कळंब ,प्रतीज्ञा वरखेडकर सहाय्यक केंद्र संचालिका कळंब यांनी केले आरोग्य तपासणी उपजिल्हा रुग्णालय कळंब चे डॉ, तुकाराम कांबळे, डॉ. स्नेहल मोहोळकर, अश्विनी बाबर फार्मासिस्ट, सुकेशना लोंढे एएनएम यांनी केली याप्रसंगी महादेव महाराज अडसूळ जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक महासंघ, माधवसिंग राजपूत ,गणेश गोरे ,जालिंदर ननवरे ,मनोज मुळीक ,अश्रुबा झांबरे, , बळीराम कवडे , यांच्यासह कामगारांची उपस्थिती होती शिबिर यशस्वी करण्यासाठी उमेश जगदाळे केंद्रप्रमुख धाराशिव - कळंब , मनीषा भडंगे , महिला केंद्र संचालिका धाराशिव, प्रतीज्ञा वरखेडकर, महिला केंद्र संचालिका कळंब , दिनेश गिरी, ग्रंथपाल ,अनुजा कुलकर्णी ,यशोदा शिंपले यांनी परिश्रम घेतले.
