कृषि उत्पन्न बाजार समिती,कळंब येथे जिल्हातील सर्व सभापतींची बैठक संपन्न.
अवैद्य खरेदी बाबत झाली सखोल चर्चा अवैद्य खरेदीवर होणार नियंत्रण.
देशभक्त न्युज - कळंब प्रतिनिधी / -
सद्या सोयाबीन पिकाची काढणीस सुरूवात झाली आहे. बाजार आवारात सोयाबीन ची चांगली आवक व्हावी म्हणून व खेड्यातील अवैद्य खेडा खरेदी,थेट पणन,सिंगल परवाना व एफ.पी.ओ.च्या माध्यमातून खरेदी होत असलेल्या अवैद्य खरेदीवर नियंत्रण करण्या करीता कृउबास कळंबचे सभापती शिवाजी कापसे यांचे अध्यक्षतेखाली सभापती व सचिवांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. सदर बैठकीस कृउबास केज चे सभापती अंकुश इंगळे, सचिव संतोष देखमुख, दिलीपराव गुळबिले, कृउबास धाराशिव चे सचिव,कृउबास वाशी चे सभापती व सचिव, कृउबास कळंबचे व्यापारी संचालक कोल्हे नाना व रोहन पारख, व्यापारी बोराडे दादा,कृउबास भूम चे प्रतिनीधी, कृउबास मुरूड चे प्रतिनीधी उपस्थित होते. सदर बैठकीत आसपासचे खेडेगावात राजरोसपणे विना परवाना तसेच परवाना घेवूनही विना पावती चे व्यवहार करणारे व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करतात यातून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक ही झाली आहे. यावर्षी पासून कोणताही शेतकरी अशा व्यापाऱ्यांच्या भूलथापाला बळी पडून फसला जाणार नाही या करीता कळंब बाजार समितीने जिल्हातील व आसपासच्या बाजार समित्यांचे अधिकारी व पदाधीकाऱ्यांची बैठक आयोजीत केली होती.खेडा खरेदी तसेच थेट पणन च्या नावाखाली मोठमोठे अवैद्य केंद्र स्थापन करून, प्रक्रिया च्या नावाखाली खरेदी करणाऱ्या कंपन्यांनाही इथून पुढे कायद्याच्या कचाट्यात घेण्याचे ठरले आहे. मोठमोठ्या कंपण्या थेट पणन च्या परवाना च्या अटी शर्तीचे अनेक वेळा उल्लंघन केलेले दिसून येत आहेत असे सचिव वाघ यांनी कागदपत्रासह सर्व माहीती उपस्तांच्या समोर सादर केली. थेट पणन चे परवाना प्राप्त होताना घालून दिलेल्या अटी शर्ती तसेच परवाना मागणी करणाऱ्या व्यक्तींने / कंपणीने दिलेले करारनामे, शपथपत्रे, याचे वारंवार त्यांचेकडूनच उल्लंघन होते अशा उल्लंघन झालेल्या परवाना बाबत पणन संचालक महाराष्ट्र राज्य् पूणे. यांचे परवान्यातील अटी प्रमाणे सदर परवाना रद्द समजण्यात यावा असे स्पष्ट लिहीलेले असतानाही अनेक कंपण्यांकडून त्याचे वारंवार उल्लंघन होते करीता यावर कडक निर्बंध लावू. असे बैठकीत सर्वानुमते ठरले. बैठकीत इथून पुढे विना गेट पास अथवा सेस पावती न भरलेल्या वाहनांवर कर्मचारी मार्फत कारवाई करण्याचे सर्वानुमते ठरले. बाजार समितीत आलेल्या सर्व मान्यवरांचे सभापती शिवाजी कापसे यांनी शाल श्रीफळ देवून स्वागत केले.
