Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नळदुर्ग येथील जिल्हा परिषद केंद्रिय शाळेत स्वच्छता अभियान अंतर्गत शाळेची व परिसराची स्वच्छता

 नळदुर्ग येथील जिल्हा परिषद केंद्रिय शाळेत स्वच्छता अभियान अंतर्गत शाळेची व परिसराची स्वच्छता 

              


देशभक्त न्युज - नळदुर्ग प्रतिनिधी / -

येथील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळे मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्या शासन स्तरावर राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानच्या अनुषंगाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

 जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळेमध्ये १/ऑक्टोबर 2023 रोजी स्वच्छता करण्यात आली. यामध्ये शाळेतील आतील बाजूस व बाहेरील बाजूस स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत शाळेचे मुख्याध्यापक भास्कर मस्के शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा अंलका कोरे सहशिक्षक सौदागर बिलाल सहशिक्षिका भालकटे , चौधरी , व्यवस्थापन समिती, सदस्य नेताजी महाबोले लक्ष्मीबाई कलशेट्टी व्यवस्थापन समिती सदस्य ( विध्यार्थीनी प्रतिनिधी ) स्नेहा सुरवसे अमर कलशेट्टी पालक नदाफताई, शिवलीलाताई कलशेट्टी व शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन हे स्वच्छता अभियान राबविले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.