येरमाळ्याच्या आई येडेश्वरीच्या नवरात्र महोत्सवास घटस्थापनेने सुरुवात
देशभक्त न्युज - येरमाळा प्रतिनिधी / -
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाची रविवारपासून सुरुवात झाली असुन दि १५ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२३ पर्यंत विविध गावच्या भजनी मंडळीच्या भजन कर्तन दैनंदिनी कार्यक्रमाने संपन्न होत असुन रविवारपासुन घटस्थापनेने प्रारंभ झाला असून या महोत्सवासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे .
यामध्ये येडेश्वरी मंदिराचा परिसर स्वच्छ करणे, मंदिरावर रंगरंगोटी, मंदिरातील चांदीचे आवरण असलेले खांब स्वच्छ करणे , मंदिरातील तांब्याच्या पितळाच्या मोठ्या वस्तू स्वच्छ करणे ,तसेच मंदिरावर तसेच मंदिर परिसरामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई अशी विविध कामे लगबगीने करण्यात येत आहेत .महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून श्री येडेश्वरी देवी मानली जाते . तुळजाभवानीचे दर्शन झाल्यानंतर तुळजापुरला येणारा भाविक आवर्जून येरमाळाला दर्शनासाठी येतो नवरात्र काळात राज्यातील लोक तसेच पंचक्रोशीतील लोक देवीला खेटा घालण्यासाठी नवरात्र काळात नवरात्र काळात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात तसेच घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवसापासून देवीच्या डोंगराला खेटा पूर्ण डोंगराला पाठीमागे न पाहता प्रदक्षिणा घालण्याची पद्धत रूढ झाल्याने लोक पाच दिवस भल्या पहाटेपासून खेटा घालतात नवरात्र महोत्सव तसेच चैत्र पौर्णिमा नारळी पौर्णिमा या यात्रेदरम्यान भाविक देवीच्या डोंगराला दोरा वाहून साकडे घालून नवस पूर्ण करतात .
खेटा घालणाऱ्या भक्त भविकांसाठी अवाहन ....
येरमाळा व परिसरातील भक्त पहाटे चार पासुन खेटा घालतात . सध्या धाराशिव जिल्ह्यातील वनक्षेत्रामध्ये बिबट्या वावरत असल्याच्या बातम्या पसरत आहेत त्या अनुषंगाने भक्तांनी अंधारात खेटा न घालता सकाळी प्रकाशातच खेटा घालावा असे आवाहन मंदिराचे विश्वस्त संतोष आगलावे यांनी केले आहे .
विद्युत रोषणाईने नटाला देवी मंदिर परिसर ...
येडेश्वरी देवीच्या मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मंदिराच्या शिखरावर तसेच पायऱ्यावर व मंदिर परिसरामध्ये व मंदिर परिसराच्या गाभाऱ्यामध्ये सुंदर अशी रोषणाई केल्याने मंदिरा परिसरात मंगलमय वातावरण तयार झाले आहे या रोषणाईमुळे मंदिर परिसरात स्वच्छ असा प्रकाश दिसत आहे
श्री येडेश्वरी देवी ट्रस्ट च्या वतीने भविकासाठी उत्तम सोयी सुविधा ....
नवरात्र काळामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदिर संस्थांकडून दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व प्रदक्षिणा मार्गावरील रस्त्याची स्वच्छता व तसेच प्रदक्षिणा मार्गावर जागोजागी लाईटची व्यवस्था आदी कामे करण्यात आली असल्याचे येडेश्वरी मंदिर संस्थानचे अध्यक्ष बापूसाहेब बेंद्रे , उपाध्यक्ष संजय आगलावे , सचिव राजाभाऊ बेंद्रे यांनी सांगितले
येरमाळा पोस्टे कडुन चोख बंदोबस्त ....
येडेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सव काळात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येरमाळा पोलीस स्टेशनच्या वतीने 5 पोलीसअधिकारी, 45 पोलीस कॉन्स्टेबल,20 महिला कॉन्स्टेबल, 60 होमगार्ड असा असा बंदोबस्त वरिष्ठाकडे मागणी केले असल्याची येरमाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील यांची माहिती .
