आदित्य शिक्षण संस्था, बीड येथे विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शनपर व्याख्यान
महाविद्यालयात विविध उपक्रम राबनून आदित्य शिक्षण संस्था ठरतेय विद्यार्थ्यांच्या यशस्वी जिवनाची दिशा
बीड । प्रतिनीधी
आदित्य शिक्षण संस्थेच्या डॉ.आदिती सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात विविध शाखेतील विद्यार्थी , विद्यार्थीनी यांच्या जिवनात एक नवीन आशेचा किरण नार्माण व्हावा त्यांच्या मनातील न्युनगंड दुर होवून आपण ठाव मनाचा निश्चय करून मनात जिद्द , चिकाटी ठेवली तर भविष्यातील यश आपण खेचुन आणू शकतो व माता ,पित्या सह नातेवाईक , मित्रमंडळी यांनी आपल्या प्रति पाहिलेले स्वप्न आपण पूर्ण करु शकतो . यासाठी व विद्यार्थ्यांचे जिवन घडविण्यासाठी महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यानुसारच दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालया अंतर्गत विद्यार्थ्यासाठी करियर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमास महाराष्ट्र शासन सेवेत कार्यरत असणारे बीड जिल्ह्याचे वन अधिक्षक अमोल गर्कळ , यांनी विद्यार्थ्याना सर्वसमावेशक असे विविध विद्यार्थी दशेतील विविध पैलु देवून जिवनात यशस्वी होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्तविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अमोल सानप यांनी केले व गर्कळ यांचा जीवन प्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या आई -वडिलांच्या अपेक्षांना ओझे न मानता प्रेरणा मानवी व अभ्यास कसा करावा, सर्वांगीण विकास करून यशस्वी कसे या बाबत वक्त्यांनी सविस्थर मार्गदर्शन केले.
तसेच कृषी संलग्न महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम भुतडा, डॉ. सतिश कचरे, डॉ.विकास गर्जे यांनी या आयोजित कार्यक्रमाप्रती विशेष आभार मानले .

