चोराखळी ग्राप . कडुन होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याची तपासणी करुन दोषीवर कारवाईची अॅ ड . खुने यांची मागणी
अनुसुचित जाती वस्ती असलेल्या प्रभागामधील बौद्ध व मातंग वस्तीत पाणीपुरवठा विहीरीतुन टीसीएल पावडर न टाकताच होतोय पाणी पुरठा
देशभक्त न्युज - कळंब प्रतिनिधी / -
कळंब तालुक्यातील चोराखळी ग्रामपंचायत कार्यालयाकडुन मागिल एक वर्षापासुन अनुसुचित जाती वस्ती असलेल्या प्रभागामधील बौद्ध व मातंग वस्तीसाठी केला जाणारा पाणीपुरठा पाण्याची कोणतीही तपासणी , पाणी पुरठ्याच्या विहीरीतील पाण्यात टी. सी .एल . पावडर न टाकताच सदरील दोन्ही वस्त्यामध्ये पाणी पुरवठा केला जातो यामुळे दुषित पाणी पुरवठा करणाऱ्या दोषींवर कडक कारवाईची मागणी चोराखळी गावचेच अॅ ड . एल . जी . खुने यांनी दि . १७ ऑक्टोबर रोजी लेखी तक्रारी निवेदनाद्वारे केली आहे .
दिलेल्या निवेदनात अॅड . खुने यांनी असेही म्हटले आहे की , मागील एक वर्षापासुन ग्रापकडुन हा दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असुन वारंवर तोंडी सांगूनही ग्रापच्या प्रशासनास फरक पडत नाही . बौद्ध वस्ती , मातंग वस्ती येथील नागरिकांना जाणून बुजुन जातीय व्देष भावनेतुन असा दूषित पाणी पुरवठा करण्यात येत असुन दिलेल्या तक्रारी नुसार ग्राप प्रशसनाला कोणतीही पूर्वसुचना न देता जायमोक्यावर प्रत्यक्ष भेट देवून पथकामार्फत याची निपक्षः पातीपने चौकशी करावी व दूषित पाणी पुरवठा करणाऱ्या दोषीवर कायदेशिर तरतुदी नुसार कार्यवाही करण्यात यावी . अशीही मागणी तालुका आरोग्य अधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा आरोग्य अधिकारी , गटविकास अधिकारी यांचेकडे दिलेल्या निवेदनाद्वारे अॅ ड . खुने यांनी केली आहे .
