जिल्हा परिषद प्रशाला ईटकुर येथील दोन विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
देशभक्त न्युज - ईटकूर प्रतिनिधी / -
महाराष्ट्र शासन जिल्हा क्रीडा कार्यालय धाराशिव यांच्यामार्फत आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूल ईटकूर येथील ओंकार संतोष मोरे या विद्यार्थ्यांची क्रिकेट या खेळासाठी श्री गुरुगोविंद सिंग जी स्टेडियम नांदेड येथे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली तसेच आदित्य सुतार या विद्यार्थ्यांची मैदानी खेळामध्ये भाला फेक प्रकारात लातूर विभागासाठी निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना संदीप जाधव , शिंदे सी. जे. , गणेश कोठावळे, सय्यद महंमद , चौधरी व्ही. एम., क्षीरसागर ए एस , ओव्हाळ यांचे मार्गदर्शन लाभले. गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय समिती अध्यक्ष हरिदास पावले, उपाध्यक्ष प्रभाकर अडसूळ व सर्व सदस्य यांनी अभिनंदन केल.

