तेरणा साखर कारखान्याचा बाॅयलर अग्निप्रदिपनाचा शुभारंभ आज
न्यायालयीन निवाड्यानंतर पंचेवीस वर्षासाठी सदर कारखाना भैरनाथ शुगर्स कडे चालविण्यास आल्याने तेरणाचे बारा वर्षाचे ग्रहण सुटले
देशभक्त न्युज - धाराशिव प्रतिनीधी / -
ढोकी येथील तेरणा साखर कारखान्याच्या बाॅयलर अग्णिप्रदिपन कार्यक्रमाचे आयोजन आज शनिवार दि.२१ आक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता प्रा.शिवाजीराव सावंत यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. गेल्या बारा वर्षांपासून बंद असलेला तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सावंत यांच्या भैरवनाथ शुगर्सला पंचेवीस वर्षांच्या दीर्घ कालावधीसाठी चालविण्यासाठी दिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा कारखाना न्यायालयीन कचाट्यात सापडला होता. न्यायालयाच्या निकालानंतर हा कारखाना ना.तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ शुगर्सला चालवण्यासाठी देण्यात आला आहे. एकेकाळी शेतकऱ्यांची लक्ष्मी म्हणून ओळखला जाणारा तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना अखेरची घटिका मोजत होता. आशा काळातच ना.सावंतांनी हा कारखाना सुरू करण्याचे सुत्र हाती घेतल्यामुळे तेरणा पट्ट्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकात पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठवाड्यातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून ढोकी येथील 'तेरणा साखर' कारखान्याची गणना केली जाते. ३० हजारपेक्षा जास्त सभासदांच्या घामाच्या पैशातून हा कारखाना उभारलेला आहे. दोन तपापेक्षाही जास्त कालावधीपर्यंत हा कारखाना मोठ्या जोमाने चालला. धाराशिवसह शेजारील लातूर जिल्ह्यातीलही या कारखान्यास सभासद आहेत. दहा हजार प्रती दिवस मेट्रिक टन क्षमतेने चालणारा कारखाना तब्बल एक तपापासून बंद असलेला कारखाना पुन्हा सुरू होत असल्याने पंचक्रोशीतील वातावरण उजळून निघाला असल्याचे दिसून येत आहे. तेरणा साखर कारखान्यांमुळे तेरणा पट्ट्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, वाहतूक ठेकेदार, विविध व्यावसायिक यांच्या जिवनमानात मोठा बदल होऊन आर्थिक संपन्नता निर्माण झाली होती. त्यामुळे तेरणा साखर कारखान्याला या पट्ट्यातील शेतकरी " शेतकऱ्यांची लक्ष्मी" म्हणून संबोधीत होते. मागील बारा वर्षापासून शेतकऱ्यांची लक्ष्मी बंद असलेली लक्ष्मी पुन्हा सुरू होत असल्याने तेरणा पट्ट्यातील आर्थिक घडी पुन्हा उभारी घेणार असल्याचे तज्ञातून सांगितले जाते. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली तेरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांना पुन्हा गतवैभव मिळणार असल्याचा विश्वास शेतकऱ्यांतून व्यक्त केला जात आहे.

