Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गॅसचा भडका उडाल्याने जखमी झालेल्या मंडले दांम्पत्यांची सातलिंग स्वामी यांनी घेतली भेट

 गॅसचा भडका उडाल्याने जखमी झालेल्या मंडले दांम्पत्यांची सातलिंग स्वामी यांनी घेतली भेट 




उमरगा लोहारा विधानसभा लढविण्यासाठी दंड थोपटुन तयारीला लागलेले स्वामी नागरिकांच्या सुख दुःखात इतर कार्यक्रमात सहभागी होवून त्यांच्यात उमटवितात आपल्या कार्याचा अगळ वेगळा ठसा 

 देशभक्त न्युज -उमरगा प्रतिनीधी / -

भुसणी ता. उमरगा येथील युवराज आप्पाराव मंडले व सौ. गोकर्णा युवराज मंडले यांच्या घरी दिनांक 16 आक्टोंबर 2023 रोजी सकाळी 6:00 वाजता स्वयंपाक करत असताना गॅसचा भडका उडून पती व पत्नी हे दोघेही गंभीरित्या भाजून जखमी झाले. त्यामुळे त्यांना जवळच असलेल्या मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले होते. मात्र तेथून पुढील उपचारासाठी उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. दोघा पती-पत्नीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. याविषयी माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते तथा उमरगा लोहारा विधानसभेची तयारी करत असलेले सातलिंग स्वामी यांनी दिनांक 18 आक्टोंबर 2023 रोजी भुसणी येथील घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन रुग्णास भेटून आस्थेवायिकपणे चौकशी करून त्यांना धीर दिला. त्यांच्यासोबत भुसणी येथील  शंभूलिंग स्वामी, मुरूम येथील वीरभद्र स्वामी, जळकोट येथील पत्रकार संजय रेणुके, भीमाशंकर यादगौडा आदी उपस्थित होते.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.