Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या संकल्पनेतील आरोग्य व हरित वारी,आपल्या दारी मोहिमेचा शुभारंभ शिराढोण येथून सुरू

 डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या संकल्पनेतील आरोग्य व हरित वारी,आपल्या दारी मोहिमेचा शुभारंभ शिराढोण येथून सुरू

              


देशभक्त न्युज - शिराढोण प्रतिनिधी / -

आर.पी.हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट परभणी,वेलनेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी धाराशिव व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने शिराढोण वर्षानिमित्त मोफत थेरपी कॅम्प, आरोग्य शिबिर व साहेब आधारवड वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

या आरोग्य शिबिरासाठी डॉ.श्रीराम देवकते, डॉ.किरण ठेंगल, डॉ.हनुमंत गव्हाणे, डॉ.अविनाश तांबारे, डॉ.महेश पाटील, डॉ.उमा पावडशेट्टी,डॉ. पूजा आचार्य यांनी मार्गदर्शन व तपासणी केली.यामध्ये शिराढोण व शिराढोण परिसरातील अनेक गावातील गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. रुग्णांमध्ये डोळे तपासणी,अंगदुखी, बधिरपणा यासह अनेक आजारांवर उपचार तज्ज्ञ डॉक्टरांनी केला. यामध्ये २६७ रूग्णांनी सहभाग घेतला.या आरोग्य शिबिरास माजी उपसभापती गुणवंत पवार,भाऊसाहेब पाटील, राजाभाऊ पाटील,आयुब कुरेशी पाशा पठाण मकबूल डांगे सिकंदर कुरेशी, अहमद बागवान, सलमान शेख, मुमताज पटेल,शाहरुख खतीब, बाळासाहेब सोनके, नितीन पाटील,आखिल डांगे, सर्फराज कुरेशी,संजय पाटील,विनोद पाटील, परमेश्वर पाटील, दत्ता चोरघडे,धीरज घुटे,महेश पाटील,विशाल सोनके,परवेज बागवान, साजिद शेख,अलिअकबर पठाण,प्रकाश मुंदडा,जगदिश शेख,बबलू शेख,आयात डांगे,उस्मान तांबोळी,खय्युम कूरेशी,शौकत शेख,अझर बेग यांच्यासह अनेक ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.